Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




मालेगावात ९७ हजारांचा गुटखा जप्त ; विशेष पोलिस पथकाची कारवाई

दि . 26/12/2019

मालेगाव : शहरातील सरदार चौक भागातील 
यादगार कॅन्टीन येथे विशेष पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत ९७ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंग व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने काल २ वा. सुमारास शहरातील यादगार कॅन्टीन, सरदार चौक येथे केलेल्या कारवाईत स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीर रित्या गुटखा विक्री व साठवणूक केली म्हणून आरोपी शेख अतिक शेख सलीम याचे ताब्यातून ९७ हजार ७३० रुपये किमतीचा गुटखा ताब्यात    घेतला असून पोलीस स्टेशन मालेगाव शहर पोलीस स्टेशनला जमा करून आज रोजी सदरचा मुद्देमाल पुढील कार्यवाही कमी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी जी.के.वसावे यांच्या ताब्यात दिला. सदर कारवाईत सहा.पोलीस निरीक्षक सागर कोते सागर, पो.कॉ तुषार आहिरे, दिनेश शेरावते, अभिजीत साबळे,सानप आदींचा समावेश होता.


ताज्या बातम्या