Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
संगमेश्वर भागात घरफोडी ; दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास..

दि . 26/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरातील संगमेश्वर भागातील ज्योतीनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी सुनिता आप्पासाहेब चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरूद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी सुनिता चौधरी या बाहेरगावी गेल्या होत्या.२५ डिसेंबर रोजी त्या घरी परतल्या असता सदर प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरून २ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात सुनिता चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय पाटील करीत आहेत.

 


ताज्या बातम्या