Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मनमाड चौफुली येथे जुगार अड्ड्यावर छापा,विशेष पोलिस पथकाची कारवाई ; ६ जणांसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त 

दि . 22/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मनमाड चौफुली येथील इसार पेट्रोल पंपा समोरील राजेंद्र धनाजी वाघ यांच्या शेतालगत असलेल्या मोकळ्या जागी जुगार खेळणाऱ्या सहा जणांना येथील अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पोलीस पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २ लाख १७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना मिळालेल्या माहितीनुसार काल रविवार दि.२२रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीर अवैध ५२ पत्याच्या २ कॅटवर पैसे लावून रमी नावचा जूगार खेळताना आढळून आले. पथकाने या सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम ३१ हजार ७४० रोख रक्कम व जुगार साहित्य व ६ मोबाईल, ४ मोटर सायकल, असा एकूण २ लाख १७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वरील आरोपी व मुद्देमालासह किल्ला पोलिस ठाणे  येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक सागर कोते, पो.कॉ तुषार आहिरे, दिनेश शेरावते, अभिजीत साबळे, सानप यांचा सहभाग होता.


ताज्या बातम्या