Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अंनिसतर्फे मालेगावात जेष्ठ रंगकर्मी डॉ श्रीराम लागुंना आदरांजली..

दि . 22/12/2019

मालेगाव: येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व विविध समविचारी संस्थांतर्फे जेष्ठ रंगकर्मी व सामाजिक सक्रिय कार्यकर्ते डॉ श्रीराम लागू यांना अभिवादन करण्यात आले.वैज्ञानिक जाणीवा प्रमुख नम्रता जगताप यांनी विवेकी प्रतिज्ञा घेत उपस्थितांकडून अंनिस कार्य वाढविण्याचा संकल्प केला.
येथील राजेंद्र भोसले संपर्क कार्यालयात या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
समाज शिक्षित व जागृत करण्याचे काम झाले नाही.नवी पिढी सजग व्हावी.या करीता डॉ लागू राज्यभर फिरले.अंधश्रद्धा निर्मुलनासाठी रचनात्मक कार्य केल्याच्या आठवणी या वेळी सांगितल्या.
या वेळी डॉ संदीप खैरनार, संजय पांडे, अशोक फराटे, डॉ सुगन बरंठ
ताऊ परदेशी,अजय शहा, राजेंद्र भोसले यांनी श्रद्धांजली अर्पण केली. विकास मंडळ,अजय शहा, स्वाती वाणी, अशोक फराटे,अशोक पठाडे,रविराज सोनार, उमेश अस्मर, संदीप पवार, नरेंद्र सोनवणे, वाय.आर.खैरनार, सुधीर साळुंके, रवींद्र ओस्तवाल, निलेश पाटील,तुलशी मोरे, राजीव वडगे, राजेंद्र दिघे, भाऊसाहेब वाघ, नितीन बोराळे, जयेश शेलार, भिला महाजन,प्रविण वाणी, दिनेश ठाकरे, सोमनाथ वडगे,हरीष पाठक, दिलीप पाथरे आदींसह मोठ्या संख्येने समविचारी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.


ताज्या बातम्या