Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात कचरा ठेकेदाराकडून जनतेच्या पैशांची होत असलेल्या लुटीचा भांडाफोड..

दि . 22/12/2019

मालेगाव - शहरातील कचरा संकलानाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील कचरा संकलनाचा ठेका वोटरग्रेस या कंपनीला देण्यात आला आहे. त्याविषयी अनेकवेळा तक्रारी आंदोलने झालीत. कचरा संकलनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप देखील झाले आहेत. माजी मंत्री व आमदार दादा भुसे यांनी देखील या प्रश्नी आंदोलन करून ही समस्या जैसे थे आहे. अखेर शनिवारी ( दि. २१ ) उपमहापौर निलेश आहेर यांच्यासह शिवसेना नगरसेवकांनी थेट कचरा डेपोमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून कचरा संकलनात सुरु असलेल्या भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. कचरा वाहनांच्या वजनाची प्रत्यक्ष पाहणीत आढळून आलेलेली तफावत लक्षात घेता हजारो कोटी रु. चा भ्रष्टाचार कचरा संकलनच्या नावाने होत असल्याची गंभीर बाब यामुळे समोर आली आहे. उपमहापौर निलेश आहेर यांनी शनिवारी सायंकाळी महापालिकेतील आपल्या दालनात याविषयी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह भांडाफोड केला. यावेळी माजी उपमहापौर सखाराम घोडके, नगरसेवक जे. पी. बच्छाव, भीमा भडांगे, राजेश गंगावणे आदी उपस्थित होते. शनिवारी सकाळी उपमहापौर आहेर व शिवसेना नगरसेवकांनी प्रत्यक्ष कचरा डेपोवर जावून पाहणी केली. त्यानंतर ही धक्कदायक बाब समोर आली आहे. कचरा संकलन केलेले आठ वाहने तपासली जाणार होती मात्र बिंग उघड होईल या भीतीने यातील ३ वाहने तेथून फरार झालीत. उर्वरित पाच पाहणांची फेरमोजणी केली असता कचरा संकलन करतांना कचरासह वाहनाचे वजन, कचराशिवाय वाहनाचे वजन व प्रत्यक्ष संकलित केलेल्या कच-याचे वजन यात तफावत आढळून आली.  वाहनांचे अधिक वजन भरावे यासाठी कच-यात मोठे दगड, विटा, माती भरल्याचे आढळून आले. पालिकेचा वजन काटा बंद आढळून आला. खाजगी वजन काट्यावर वजन केले जात असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे कचरा संकलन केंद्रावर पालिकेचे सक्षम अधिकारी गैरहजर असल्याचे पाहायला मिळाल्याचे आहेर यांनी सांगितले. तपासणी नंतर प्रती वाहन कच-याचे ६०० ते ८०० किलो जास्तीचे वजन आढळून आले. 
दरम्यान पालिकेत शिवसेना सत्ताधारी असल्याने याप्रश्नी काय कारवाई कराल? असे विचारले असता आहेर यांनी संबधित ठेकेदाराबाबत तक्रारी होत्या. ठेका रद्द करण्याबाबत देखील अनेकवेळा विचार झाला. परंतु त्यासाठी सक्षम पुरावे असणे गरजेचे होते. शनिवारी केलेल्या पाहणीत कचरा संकलनात भ्रष्टाचार होत असल्याचे पुरावे हाती लागले असून त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करणे शक्य होणार आहे. यासंबधी आयुक्तांना पत्र दिले जाईल. तसेच आमदार दादा भुसे यांच्या मदतीने राज्य सरकारला देखील तक्रार केली जाईल. येत्या महासभेत ठेका रद्द करण्याबाबत ठराव आणला जाईल. ठेकेदाराचा चौकशी अहवाल महासभेपुढे मांडला जाईल. जनतेच्या पैशाची ही लुट सुरु असून ती थांबण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे आश्वसन त्यांनी यावेळी दिले. 

शहरात कचरा संकल केलेले वाहन लक्ष्मी बे ब्रिज या खाजगी वजन काट्यावर जाते. शनिवारी कचराचे एक वाहन ( एम एच १५ सी ८२८६ )ची तपासणी करण्यात आली. यात लक्ष्मी वे ब्रिजवर कचरासह वजन आले ५ हजार ४०० किलो. तर कचरा खाली केल्यावर वाहनाचे वजन आले ३ हजार २९५  किलो भरले.  या वजन काट्यावर खाली केलेल्या वाहनाचे वजन निश्चित केले असल्याची बाब समोर आली. त्यामुळे संबधित वाहनाने २ हजार १८० किलो कचरा संकलन केल्याचे वजन भरले. मात्र याच वाहनाचे अन्य एका वजन काट्यावर वजन केले असता त्यावेळी ६०० किलो वजनाचा फरक आढळून आला. याप्रमाणे तब्बल ५ वाहनांची तपासणी केली असतात सरासरी ६०० ते ८०० किलो वजनाचा फरक आढळून आला. कचरा संकलनासाठी शहरात एकूण ८४ वाहने असून प्रत्येक वाहन किमान दिवसातून दोन फे-या करते. संबधित ठेकेदारास वजनाच्या आधारावर ठेका देण्यात आल्याने वजनातील तफावत दाखूवन गेल्या सहा वर्षापासून पालिकेच्या तिजोरीची लुट ठेकेदार करीत असल्याचा आरोप यावेळी आहेर यांनी केला.


ताज्या बातम्या