Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित; टीडीएफचे सोमवार पासून महापालिकेसमोर आमरण उपोषण 

दि . 22/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थीना पोषण आहरापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच पूर्वीप्रमाणेच पोषण आहार योजना सुरू करावी, व उपमहापौर व नगरसेवकांसमोर धमकावल्या प्रकरणी आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी सोमवार दि.२३ डिसेंबर पासून महापालिकेसमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष आर.डी.निकम यांनी दिली.

शहरातील १६५ शाळेत महापालिकेने सेंट्रल किचन सिस्टम या योजनेतंर्गत काही ठेकेदारांना पोषण आहाराचा ठेका दिला आहे. मात्र या योजनेमुळे शहरातील बहुतांश विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याची तक्रार टीडीएफचे अध्यक्ष निकम यांनी केली असून यासंबंधी महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांना निवेदन देण्यासाठी निकम हे आपल्या शिष्टमंडळासह  गेले असता आयुक्त बोर्डे यांनी भेट नाकारली. यामुळे निकम यांनी आपल्या शिष्टमंडळासह आयुक्त दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपमहापौर निलेश आहेर व भाजपा नगरसेवक मदन गायकवाड यांनी निकम व शिष्टमंडळाची आयुक्त बोर्डे यांची भेट घडून आणली. मात्र यावेळी आयुक्त बोर्डे यांनी पोषण आहारातील ठेकेदारांची पाठराखण करीत आमची बाजू जाणून घेतली नाही व उद्घट भाषेचा वापर केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. म्हणून 
विद्यार्थीना पोषण आहरापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच पूर्वीप्रमाणेच पोषण आहार योजना सुरू करावी, व उपमहापौर व नगरसेवकांसमोर धमकावल्या प्रकरणी आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी सोमवार दि.२३ डिसेंबर पासून महापालिकेसमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष आर.डी.निकम यांनी दिली.


ताज्या बातम्या