Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वीज वितरणाच्या खाजगी करणाला विरोध; जन आंदोलन उभे करणार : मौलाना मुफ्ती

दि . 22/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरातील वीज पुरवठा ठेका १ जानेवारी पासून कोलकाता येथील एका खाजगी कंपनीला २० वर्षांसाठी देण्यात आला असून विजेचे हे खाजगीकरण शहरवासीयांवर अन्याय करणारे आहे. यामुळे यंत्रमाग उद्योग संकटात येऊन गोरगरीब जनतेवर आर्थिक अन्याय होईल. या वीजपुरवठा खाजगीकरणाला आमचा विरोध असून शहर वासीयांवर अन्याय होऊ नये यासाठी मोठे जनआंदोलन उभारले जाणार असून या विरोधात न्यायालयात लढा देणार असल्याची माहिती मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत डॉ.खालिद परवेज, उमेदवार मुशतकीन डिगनिटी, खलील अन्सारी, रशीद येवलेवाला आदींसह महागठबंधन आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मौलाना म्हणाले की, माजी आमदार आसिफ शेख यांनी या खाजगीकरणाला विरोध केला नाही. आम्ही आमदार झाल्यावर लगेच या विजेच्या खाजगीकरणाचा करारनामा प्रत मिळवली. विजेचे खाजगीकरणाचा ठेका रद्द करण्या बाबत   कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. आम्ही या विजेच्या खाजगीकरणाचा बहिष्कार करतो. शहर वासीयांवर अन्याय होऊ नये यासाठी मोठे जनआंदोलन उभारले जाणार असून न्यायालयात लढाई लढणार असल्याचे मौलाना म्हणाले. तसेच देशभरात सीएए व एनआरसी विरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. मालेगाव शहरात देखील या विरोधात संविधान बचाव कमिटीच्या नेतृत्वाखाली विराट व शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. यानंतर देखील या विरोधात लढा सुरू राहणार असल्याचे मौलाना यांनी स्पष्ट केले.

जनता दलाचे नेते नगरसेवक बुलंद इकबाल यांच्या निधनानंतर प्रभाग १२ ड मधील जागा रिक्त झाल्याने निवडणूक आयोगाने या जागेसाठीचा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत महा गठबंधन आघाडीच्या वतीने जनता दल सेक्युलर जनरल सेक्रेटरी मुशतकीन मोह. मुस्तफा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती डॉ.खालिद परवेज यांनी यावेळी दिली.


ताज्या बातम्या