Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नागरिकत्व कायद्या विरोधात मोर्चा..

दि . 19/12/2019

मालेगाव : - नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात येथील मुस्लीम संघटनांच्या वतीने मोर्चा ला प्रारंभ झाला आहे. या मोर्चाला शहरातील किल्ला परिसरातून सुरुवात झाली आहे. भुईकोट किल्ला मार्गे मोर्चा खैबान निशाद चौक, चंदनपुरी गेट, मुशावरत चौक, मोहम्मद अली रोड मार्गे, किदवाई रोड येथील शहीदो कि यादगार येथे येणार आहे. या मोर्चात विविध मुस्लिम, सामाजिक व राजकीय संघटना सामील झाल्या आहेत. मोर्चा सध्या मार्गस्थ होत असून कॅब व एनआरसी ला विरोध करणारे फलक व घोषणा दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या