Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मनमाड रस्त्यावरील चोंडी घाटात बस व कारचा अपघात, सीआरपीएफ जवानासह दोघे ठार

दि . 18/12/2019

मालेगाव: येथील मालेगांव-मनमाड रस्त्यावरील चोंडी घाटातील बोयेगाव फाट्याजवळ कार व बसच्या झालेल्या अपघातात सीआरपीएफ जवानासह दोघेजण जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले आहे.

तालुक्यातील कळवाडी येथील रहिवासी असलेले गोरक्षनाथ बोरसे हे सीआरपीएफ जवान असून आज सकाळी शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन ते कार क्र. ( जीजे १८ बीसी ३८५६ ) ने  कळवाडी येथे परत येत असताना मालेगाव मनमाड रस्त्यावरील चोंडी घाटात मनमाडच्या दिशेने येणाऱ्या बस क्रमांक ( एमएच २० डी ९२०९ ) वर जाऊन आदळली.

हा अपघात इतका भीषण होता कि यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात सीआरपीएफ जवान असलेले बोरसे व अन्य एक हे जागीच ठार झाले. तर बस मधील ४ प्रवाशी गंभीर जखमी झाले. यातील जखमींना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.


ताज्या बातम्या