Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगांव तालुक्यातील देवारपाडे येथील भूमीपुत्राने घेतली सामान्य रुग्णालयाची काळजी, रुग्णालयाला मराठा उद्योजकाच्या वतीने १० कॉटची मदत

दि . 18/12/2019

मालेगांव येथील सामान्य रुग्णालयात ग्रामीण तसेच शहरी भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी ऍडमिट असतात, आणि त्यात महिला व बालरुग्णालयाची भर पडल्याने सामान्य रुग्णालयाचा भार थोडा कमी झाला आहे, 
परंतू त्यातल्या त्यात महानगरपालिका अंतर्गत असणारे रुग्णालयाची अवस्था निष्क्रिय असल्याने तेथील बरीचशी रुग्ण सामान्य रुग्णालयात हलवले जातात, व २०० खाटा असलेल्या सामान्य रुग्णालयात रुग्णाची संख्या ४०० ते ५०० पर्यंत जातं असते, त्यामुळे अतिरिक्त ताण हा तेथील कर्मचारी तसेच अधिकारी वर्गावर पडत असतो, त्यामुळे वेळोवेळी वाद - आंदोलने/ हॉस्पिटल बंध ह्यांना सामोरे जाऊन पोलिसांच्या मदतीने वाद मिटवावे लागतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही काम केल्याचे समाधान मिळत नाही व रुग्णांना ही.
हे सगळ्या घटना वारंवार बघत असतांना असेच एक पेशंट महिला बालरुग्णालय येथे बाळंतपण साठी ऍडमिट करण्यात आले व, तेथील सोयी सुविधा तसेच आपल्याला मिळणारी शासकीय दवाखान्यातील ट्रीटमेंट ह्या सर्व गोष्टी बघता तालुक्यातील देवारपाडे गावाचे अमोल भिकन महाडिक ह्यांनी ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेतला, महिला व बालरुग्णालय येथिल सेवा सुविधा ही सुद्धा अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे, सामान्य रुग्णालयातील एवढा रुग्णाचा वाढता लोंढा, आणि त्यातल्या त्यात वाढती डेंग्यू व इतर संसर्गजन्य रोगाची साथ ह्यामध्ये सामान्य रुग्णालय येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर डांगे, डॉ. हितेश महाले, डॉ. शिलवंत, डॉ. मोमीन, डॉ. पठाण,डॉ.केदारे, डॉ. ओम जाधव, ह्या सर्व टीमने उत्कृष्ट कामगिरी केली, त्याच्या कार्याची दखल घेत असताना, अपुरे बेड, अपूर्ण यंत्र सामुग्री, पाहता, मा. अमोल महाडिक,डॉ. भूषण पाटील,अरविंद फाजगे, गणपती सावंत,नानासाहेब घुमरे, श्रीओम अहिरराव, निलेश नेरे, शरद कात्रजकर तसेच सर्वच्या सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील इतर व्यावसायिक मित्र परिवाराने डोनेशन जमा करून १० उच्च प्रतीचे कॉट - पाळण्यासह रुग्णालयाला भेट दिले, त्यामुळे रुग्णालयातील नातेवाईक, कर्मचारी वृंद, मेहुन मॅडम ह्यांनी त्या सर्वांचे अभिनंदन केले, सतीश पगार सर ह्यांनी सूत्रसंचालन केले,व  मराठा उद्योजक संघाच्या सर्व सदस्याचे आभार मानले,

त्यांनतर प्रसार माध्यमांशी बोलत असताना मा. अमोल महाडिक ह्यांनी सर्व राजकीय ,सामाजिक, व्यापारी, क्षेत्रातील दानशूर व्यक्तींना आवाहन केले की, शासकीय रुग्णालया संदर्भात, सकारात्मक भाव जागृत  ठेवावा, तसेच रुग्णालयातील डॉ, नर्स, तसेच इतर सर्व कर्मचारी वृदांना, जास्तीत जास्त सहकार्य करावे, व प्रोत्साहन द्यावे,

दोन्ही रुग्णालयात रुग्णावर उपचारासाठी मालेगांव येथील लोक प्रतिनिधी, नगरसेवक, जि. प. सदस्य, पं.स.सदस्य ह्यांनी आत्मपरीक्षण करत सामान्य रुग्णालय व सामान्य रुग्णालयासाठी सर्वोत्तपरी काय मदत कशा स्वरूपात करता येईल ह्यावर लक्ष केंद्रित करावे,
आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो हा नितिभाव जपत शक्यतोपरी प्रयत्न करून तेथील कर्मचारी व स्टाफ ह्यांच्या सेवा कार्याला प्रोत्साहन द्यावी, असी त्याच्या टीमच्या वतीने विनंती करण्यात आली,


ताज्या बातम्या