Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महाराष्ट्र राज्य ओपन ग्रॅपलिग दंगल स्पर्धेत पाटणे येथील धनश्रीला सुवर्ण पदक; नॅशनल ओपन दंगलसाठी निवड...

दि . 17/12/2019

मालेगाव - नाशिक येथील मिनाताई ठाकरे क्रिंडा संकुल येथे झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र राज्य ओपन ग्रॅपलिग दंगल स्पर्धेत मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील सुसंस्कार सेमी इंग्लिश स्कुल टेहरे येथील विद्यार्थिनी कु.धनश्री प्रविण नहार रा.पाटणे हिने  सुवर्ण पदक पटकावीत घवघवित यश संपादन केले. सप्टेंबर महिन्यात हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशीप स्पर्धेत देखील धनश्रीने रौप्य पदक पटकावीत यश संपादन केले होते.

महाराष्ट्र ग्रॅपलिग असोसिएशन महाराष्ट्र संचलित एस.बी.स्पोर्ट क्लब पाटणे तर्फे धनश्रीची या स्पर्धेकरिता निवड झाली होती. दि.१३ ते १५ डिसेंबर या कालावधीत नाशिक येथे झालेल्या या स्पर्धेत धनश्रीने मिळविलेल्या या यशामुळे तिची
दि.२ ते ५ जानेवारी रोजी तालकटोरा स्टेडियम न्यू दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल ओपन दंगलसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल धनश्री व तिचे प्रशिक्षक प्रशांत बच्छाव व मार्गदर्शक संदीप बोरसे यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.  


ताज्या बातम्या