Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
राज्यातील सर्व शाळांमध्ये बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करा ; मनसे शहराध्यक्ष राकेश भामरे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..

दि . 17/12/2019मालेगाव :- राज्यातील सर्व शासकीय-अशासकीय शाळांमध्ये बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालेगाव शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून सदर निवेदन अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना देण्यात आले आहे.

राज्य शासन प्राथमिक ते उच्च शिक्षणावर कोट्यवधींचा खर्च करते. मात्र त्यानंतरही शैक्षणिक दर्जा अपेक्षेचा स्तर गाठताना दिसत नाही. यातील अनेक कारणांपैकी शिक्षकांचे मनमर्जी कामकाज हे एक आहे. जिल्हा परिषद व माध्यमिक तसेच महाविद्यालयीन बहुतांश शिक्षक आपल्या सत्र कालावधीत ज्ञानदानाचे कार्य सुनिश्‍चित पद्धतीने करित नाहीत. जिल्हा परिषदेचे शिक्षक मुख्यालयी थांबत नाहीत. तालुका ठिकाणी राहून ग्रामीण भागातील शाळेत ये-जा करतात. त्यात वेळेचे भान पाळले जात नाही. आदिवासी, दुर्गम भागातील शिक्षक तर आठवड्यातून एक-दोन दिवसच शाळेवर जातात. द्विशिक्षकी शाळा असेल तर, एक शिक्षक शाळेत आणि दुसरा घरी थांबतो, असेही प्रकार ऐकिवात आहे. तर मोठ्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे शिक्षक तर आपल्या संस्थाध्यक्ष, नेत्याच्या राजकीय कामावरच तैनात असतात. एकाच वेळी हजेरीवर स्वाक्षर्‍या करुन खासगी कामांवर जातात. यातून शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे. ही गैरव्यवस्था रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांना बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करावी. शिवाय शाळेत येताना व सुटी झाल्यानंतर अशा दोन वेळा नोंदी घेण्यात याव्यात, त्यातून निश्‍चितच लेटलतिफ आणि शाळाबाह्य कामांवर फिरणार्‍या शिक्षकांना चाप लागेल. तरी राज्यातील सर्व शाळांतील शिक्षक, प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचार्‍यांना बायोमॅट्रीक हजेरी सक्तीची करावी. जळगाव तसेच नागपूर जिल्हा परिषदेने असा आदेशही काढला असून हा पॅटर्न राज्यभर राबवावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी मनसे शहराध्यक्ष राकेश भामरे यांच्यासह जय तिवारी, प्रवीण सोनवणे, सुरज सोनवणे, गणेश पवार, गोकुळ सोनार, डॉ.रईस सिद्दीकी, माऊली बच्छाव, सुमित पगार, चेतेश असेरी, मुन्ना सूर्यवंशी, लोकेश चव्हाण, सोहम बिरारी आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.  


ताज्या बातम्या