Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी नागरिकत्व कायद्या विरोधात १८ ला जनसभा तर १९ ला कारोबार बंद..

दि . 17/12/2019

मालेगाव  :- नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी बुधवार दि.१८ शहरातील मुस्लीम संघटना पूर्व भागात रात्री जनसभा घेणार आहेत. तर गुरुवार दि.१९ रोजी दैनंदिन कारोबार बंद ठेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे. या अनुषंगाने आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना उमरेन महेफुज रेहमानी यांनी काल सोमवारी दि.१६ रोजी रात्री मुस्लीम संघटनांची बैठक घेतली.

नागरिकत्व सुधारणा कायदा विषयी मौलाना उमरेन यांनी येथील उर्दू मिडिया सेंटर येथे सोमवारी पत्रकार परिषद घेत मुस्लीम संघटनांची भूमिका मांडली. यावेळी जमियतुल उलेमा संघटनेचे मौलाना अब्दुल हमीद जमाली, अखलाक अहमद जमली, जमाल नासीर अयुब्बी आदींसह विविध मुस्लीम संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला देशभरात विरोध वाढतो आहे. देशात धर्माच्या नावाने विभाजन करण्याचा सरकारचा हेतू असून यामुळे संविधानाच्या मूळ संरचनेस धक्का पोहचू शकतो. आता संविधान वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी मुस्लीम संघटनाची संविधान बचाव कमिटी स्थापन करण्यात आली असल्याची माहिती मौलाना उमरेन यांनी यावेळी दिली.

 


ताज्या बातम्या