Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव महापालिकेचे नूतन महापौर व उपमहापौर मुख्यमंत्र्याच्या भेटीला..

दि . 17/12/2019

मालेगाव  :- येथील महापालिकेच्या नूतन महापौर ताहेरा शेख व उपमहापौर निलेश आहेर यांनी सोमवारी आपला पदभार स्विकारल्यानंतर मंगळवार दि.१७ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मालेगाव महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता कायम राहिल्याबद्दल आ.दादा भुसे यांच्यासह महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर यांचे अभिनंदन केले व शहर विकासाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

येथील महापालिकेच्या महापौर पदी काँग्रेसच्या ताहेरा शेख तर उपमहापौर पदी सेनेचे निलेश आहेर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी काल सोमवार रोजी आपला पदभार स्वीकारला. यावेळी माजी महापौर रशीद शेख व उपमहापौर सखाराम घोडके यांनी शेख व आहेर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याकडे पदभार दिला. यावेळी महापौर शेख यांनी शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देणार असल्याचे तर उपमहापौर आहेर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे सांगितले. यानंतर महापौर शेख व उप महापौर आहेर हे सोमवारीच नागपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महा विकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले होते. शेख व आहेर यांनी काल मंगळवार रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी माजी ग्रामविकास राज्यमंत्री व आमदार दादा भुसे, माजी महापौर रशीद शेख, नगरसेवक राजाराम गंगावणे,  विनोद वाघ, किशोर बच्छाव, मनोहर बच्छाव, भरत देवरे आदींसह महाविकास आघाडीचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.


ताज्या बातम्या