Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महाराजस्व अभियानांतर्गत काकाणी विद्यालयात विद्यार्थ्यांना विविध दाखले वाटप..

दि . 16/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :-  महाराजस्व अभियानांतर्गत येथील काकाणी विद्यालयात प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या हस्ते विविध शैक्षणिक दाखल्याचे वाटप करण्यात आले.


महाराजस्व अभियानांतर्गत येथील काकाणी विद्यलयात काल सोमवार दि.१६ रोजी प्रांताधिकारी शर्मा यांच्या हस्ते जात, वय, उत्पन असे विविध दाखले वाटप करण्यात आले. जातीचा दाखला व वय अधिवास प्रमाणपत्र आपल्या शैक्षणिक आयुष्यात अतिशय महत्त्वाचे असून दहावी व बारावीच्या निकालानंतर तहसील कार्यालयात एकाच वेळी हे प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्व विद्यार्थ्यां गर्दी करीत असतात. अनेक चकरा मारूनही दाखले मिळत नाही. म्हणून शालेय स्तरावरच जातीचा, उत्पन्नाचा दाखला व वय-अधिवास प्रमाणपत्र मिळवून देण्याची सोय उपलब्ध करून दिली. विद्यार्थी आणि पालक या दोघांचाही वेळ जाऊ नये म्हणून लवकरात लवकर जर कागदपत्र दिले तर उर्वरित विद्यार्थ्यांनाही दाखले मिळू शकतील असे आश्वासन प्रांत शर्मा यांनी उपस्थित विद्यार्थ्याना दिले. विद्यार्थ्यांना दाखले मिळवून देण्यासाठी शाळेतील शिक्षक नंदू गवळी व संदीप दुसाने यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा मोरे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय येवले यांनी केले तर आभार प्रा.तुकाराम मांडवडे यांनी मानले.


ताज्या बातम्या