Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात नववीच्या विद्यार्थ्यांने घेतला गळफास..

दि . 16/12/2019

मालेगाव : शहरातील सोयगाव नववसाहत भागात राहणाऱ्या नववीतील विद्यार्थ्यांने सोमवारी (दि.१६) दुपारी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. नववीतील विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची बातमी शहरभरात पसरताच मालेगावकर सुन्न झालेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून सुमीत साहेबराव हिरे (१५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

सोयगाव तुळजाई कॉलनितील सुमीत  शिकवणीवरुन घरी परतल्यानंतर त्याने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान त्याची आई बाहेरुन घरी परतल्यानंतर सर्व पक्रार उघडकीस आला सुमीतच्या आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.


ताज्या बातम्या