Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कसमादे अपडेटचा दणका- डिके चौकातील कॅफे हाउसवर कॅम्प पोलीस आणि दामिनी पथकाचा छापा..

दि . 16/12/2019

मालेगाव शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंद्यांनी डोकेवर काढले आहे.शहरातील कॅम्प परिसरातील कॉलेजरोड येथे सुरु असलेलेया कॅफे हाउसमध्ये महाविद्यालयीन मुल-मुली अश्लील चाळे करीत असतात.मात्र स्थानिक पोलीस याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे वृत्त कसमादे अपडेटवर आज प्रसिद्ध करण्यात आले होते.या वृत्ताची दाखल घेत कॅम्प पोलीस व दामिनी पथकाने कॉलेजरोडवरील डिके चौकातील ४ ते ५ कॅफे हाउसवर छापा टाकला.

सविस्तर वृत्त असे कि,  कॅफे हाऊसच्या नावाने महाविद्यालयीन मुला मुलींसाठी भेटण्याची व्यवस्था करून देणाऱ्या  कॅम्प भागातील डिके चौकातील तीन ते चार कॅफे हाऊसवर कॅम्प पोलीस व दामिनी पथकाने छापा टाकला. या कारवाईत कॅफे हाऊसमध्ये बसून अश्लील चाळे करणाऱ्या १० ते १५ मुला मुलीसह कॅफे चालक व मालकांना ताब्यात घेण्यात आले.

शहरातील कॅम्प भागातील कॉलेज रोड व परिसरात अनेक दिवसांपासून कॅफे हाऊसच्या नावाने सुरु असलेल्या काही हॉटेलमध्ये महाविद्यालयीन मूल मुली अश्लील चाळे करीत असल्याची ओरड परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून करीत होते. याविषयी स्थानिक नागरिकांनी कसमादे अपडेट कडे वेळोवेळी तक्रार देखील केली होती. या तक्रारीनंतर कसमादे अपडेट ने याविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते. सदर  वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आज सोमवार दि.१६ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान  येथील कॅम्प पोलीस व दामिनी पथकाने संयुक्त कारवाई करीत या परिसरातील टिकटॉक नावाच्या कॅफे हाऊससह अन्य तीन ते चार कॅफे हाऊसवर छापा टाकला. यावेळी सदर कॅफे हाऊस मध्ये बसलेले काही महाविद्यालयीन मुलं मुली अश्लील चाळे करीत असताना आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी कॅफे चालक व मालक यांच्यासह मुला - मुलींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून व सदर मुलां मुलींना समन्स देऊन सोडून देण्यात आले. तर कॅफे  चालक मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे काम उशिरा सुरु होते.


ताज्या बातम्या