Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
घोडेगावात फुगे फुगवण्याचा गॅस सिलेंडरचा स्पोट; एका मुलीचा मृत्यू तर ४ ते ५ गंभीर जखमी..

दि . 16/12/2019

  तालुक्यातील घोडेगाव येथे सुरू असलेल्या यात्रेदरम्यान फुग्यामध्ये गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने एका १७ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. तालुक्यातील घोडेगाव येथील खडक वस्ती येथे सालाबादाप्रमाणे काल रविवार दि.१५ पासुन पिरबाबाच्या यात्रेस सुरुवात झाली. आज  सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास फुगे विकणार्‍या विक्रेत्याकडे फुगे घेण्यासाठी लहान मुलांनी गर्दी केली होती.

दरम्यान फुगे विक्रेता फुग्यामध्ये गॅस भरत असतानाच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात सोनी सुभाष गांगुर्डे (१५) रा. घोडेगाव या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला असून फुगे विक्रेत्यासह शुभांगी पवार (१६), यश पवार (९) व रामलाल प्रकाश गांगुर्डे (६) सर्व रा.घोडेगाव यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.

यातील गंभीर जखमी असलेल्या शुभांगी व यश यांना सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी धुळे येथील सामान्य रुग्णालयात हलविले. यातील जखमी रामलाल व अन्य जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते.


ताज्या बातम्या