Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावसह, सटाणा आणि मोसम खोऱ्यात अवैधधंदे; स्थानिक पाेलिसांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष.पाेलिस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष

दि . 16/12/2019

मालेगाव शहरात सध्या मोठे मोठे वातानुकूलित कॉपी शॉप थाटले आहेत.शहरातील कॉलेजरोड भागात दर १०० मीटरवर हे कॅफे थाटले आहे.उच्चभ्रू लोवस्तीच्या २४ तास वर्दळ असेलेल्या या ठिकाणी सकाळपासून ते सायंकाळ पर्यंत या ठींनी येणाऱ्या आणि तासनतास बसणारे आणि तेथे बसल्यावर गलिच्छ चाळे करणारे तरुण मुला मिलींना जवळपास सर्वच येजा करणारे पाहता त्यातील एका कॅफे मध्ये तर सर्वचप्रकारचे काम केलेजाते. त्यामुळे येजा करणाऱ्या सर्वांनाच याविषयी चिंता वाटू लागली आहे. परिसरातील काहींनी तर पोलिसांना प्रत्येक्ष वा अप्रत्येक्ष तक्रारी केल्या पण अद्यापही त्यावर कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय येऊ लागला आहे.वैध व्यवसाय उद‌्ध्वस्त करण्यासाठी विशेष माेहिम हाती घेतात की त्याकडे साेयीस्कर दुर्लक्ष का करतात?


मालेगावसह,सटाणा तालुक्यातील मोसम परिसरात अवैध व्यवसाय माेठ्या प्रमाणात सुरू असून ग्रामीण पाेलिस दलाच्या स्थानिक गुन्हा शाेध व पाेलिस अधीक्षक, अपर अधीक्षक, उपअधीक्षकांच्या विशेष पथकाकडूनही त्याकडे साेयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. मालेगावसह तालुक्यातील प्रत्येक खेड्यात देशी दारू,जुगार तसेह मोसम परिसरातील जायखेडा, ताहाराबाद, अंतापूर, आसखेडा भागात मटका, जुगार, गावठी दारू विक्रीच्या व्यवसायांनी रहिवाशी त्रस्त झाले असल्याच्या नागरिकांत दबक्या आवाजात चर्चा आहेत. 

माेसम परिसरातील खेड्यापाड्यांपासून ते माेठ्या गावांमध्ये ठिकठिकाणी राजराेजसपणे सुरू असलेल्या अवैद्य धंद्यांना स्थानिक पाेलिस अधिकाऱ्यांचाच वरदहस्त लाभलेला आहे की काय? असा सवाल देखील उपस्थित हाेत आहे. या अवैध धंद्यांमुळे गावोगावी गुंडगिरीचे प्रकार वाढले असून हाणामारीचे प्रकारही वाढत आहेत. मटका, जुगारीसह, वाळू तस्करीसह माेबाईलवरील राेलाेट, बिंगाेसारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू झाले अाहेत. अनेक गावांमध्ये प्रवेशद्वारावरच बसस्थानकांच्या मागील बाजूस तर काही ठिकाणी आठवडे बाजाराच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांच्या तासनतास डाव रंगताना दिसून येत आहे. मटका खेळण्यासाठी ठिकठिकाणी माेबाईलवरून आकडे टाकले जात असून त्याचा याेग्यपद्धतीने वापर केला जाताना दिसताे. नामपूर शहरात व नजीकच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्यांना माेबाईलवरून मटक्याचे अाकडे सांगण्याबराेरबरच पैशांची देवाण-घेवाणही त्याद्वारेच केली जात असल्याने पाेलिसही कानावर व डाेळ्यावर हात ठेवताना दिसून येतात. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे तक्रार केल्यास काही वेळापुरता अवैध व्यवसाय करणाऱ्यावर कारवाईचा फार्स दाखविला जाताे. काही वेळापुरतेच मटका, जुगार बंद करून पाेलिसांची पाठ फिरताच पुन्हा ते सुरळीत हाेतात, अशी परिस्थिती आहे.
मटका, जुगार, गावठी दारूसह गुटखा विक्री बंद करण्याची मागणी


पाेलिस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष
पाेलिस अधीक्षक डाॅ. आरती सिंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णत: बंद करण्याचे फर्मान साेडत विशेष पथकाद्वारे कारवाईही केली. मात्र, नव्याचे नऊ दिवस याप्रमाणेच अधिकारी नवीन आले की कारवाईचा धडका लावतात. नंतर त्यांनाही त्याचा विसर पडताे, नामपूरसह परिसरातील बागलाण व मालेगाव तालुक्यातील वाढत्या अवैध व्यवसाय उद‌्ध्वस्त करण्यासाठी विशेष माेहिम हाती घेतात की त्याकडे साेयीस्कर दुर्लक्ष करतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


ताज्या बातम्या