Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नादुरुस्त रामसेतू पुलाच्या संदर्भात मनपाच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम

दि . 11/12/2019

रामसेतू पुलाची दयनीय अवस्था,रामसेतू पुलाचे कढडे  अद्यापही लावले नसतांना विद्यार्थी नागरिकांचा जीवघेणा प्रवास 

नादुरुस्त रामसेतू पुलाच्या संदर्भात मनपाच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम; विध्यार्थी नागरिकांचा संताप 


मालेगाव शहरातील शहराला जोडणारा मुख्य रामसेतू  पूल मागील चार महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरात पूर आल्यानंतर त्या पुलाचे संपूर्ण कठडे वाहून गेले होते.
त्यामुळे फुल दुरुस्ती करणं आत्तापर्यंत शहरातील नागरिकांची मागणी होती.गेल्या चार महिन्यापासून महापालिका बांबूचे कठडे लावून काम भागवत आहे.
या पुलावरून महापालिकेचे नगरसेवक, आयुक्त पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी सर्वांची दिवसभर ये-जा असते.कठडे नसल्याने अनेक शाळकरी मुलं जीव मुठीत घेऊन चालत असतात आणि ट्रॅफिक ही मोठ्या प्रमाणात होत असते.

त्यामुळे,नागरिकांच्या जिवाला धोका पोहोचला आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील मनपा प्रशासनाकडून रामसेतू पुलाचे कठडे बांधण्यात आले नसल्याने  आज मनपाच्या  विरोधात भव्य स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत नागरिकांनी महापालिकेचा निषेध म्हणून स्वाक्षऱ्या करण्यास सुरुवात केली आहे व महापालिकेचा निषेध प्रत्यक्ष नोंदवला जात आहे. किमान निद्रितावस्थेत गेलेल्या महापालिकेला आत्ता तरी जाग येईल का असा संतप्त सवाल येथील नागरिक विद्यार्थी यांचा आहे. मालेगाव महापालिकेचे या पुलावरून ये-जा करणाऱ्या राजकीय पदाधिकारी यांचे सत्ताराजकारण सुरू आहे.राजकीय आणि प्रशासकीय अधिकारी यांना हे दिसत नसावे का हाही मोठा प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केला.


ताज्या बातम्या