Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

दि . //

मालेगाव (प्रतिनिधी) : - तालुक्यातील नगाव दिगर, काष्टी व निळगव्हाण या तीन ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक तर निमगाव येथील ३ व कळवाडी येथील १ जागा या पोटनिवडणुकीसाठी रविवारी दि.८ रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. या ग्रामपंचायतींचा काल सोमवार दि.९ रोजी निकाल जाहीर झाला. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली ११:३० वाजे पर्यंत सर्व जागेंचा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिली.

तालुक्यातील काष्टी, नगाव दिगर व निळगव्हाण या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येकी सरपंच व ९ सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात काष्टी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ४ सदस्य बिनविरोध निवडून आले असून ३ जागा रिक्त आहेत. उर्वरित दोन सदस्य व सरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत उषाबाई राजेंद्र खैरनार या सरपंच पदी निवडून आल्या असून त्यांना ९०४ मत मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी निता अशोक विचारे यांना ५०२ मत मिळाली. सदस्यपदी सविता खैरनार या ५०९ मतांनी तर राजेंद्र खैरनार हे १७७ मतांनी विजयी झाले आहेत.

नगाव दिगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदी सविता गायकवाड यांना ७७० मत मिळाली असून गायकवाड या विजयी झाल्या आहेत. त्यांनी माया वाघ यांचा पराभव केला. वाघ यांना ४८७ मत मिळाली आहे. तर सुभाष ठाकरे २६८, कल्पना गायकवाड २६८, सरला शेलार २२८, जमनादास अहिरे २५५, कल्पना गोरख अहिरे २३५, जयश्री अहिर २२६, राहुल मांदले २१९, अलकाबाई अहिरे २०७, नितीन लोखणे २०८ मतांनी विजयी झाले आहेत.

तर निळगव्हाण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २ जागा बिनविरोध झाल्या असून सरपंच पदी सुनील रमेश सकट ५२४ मतांनी विजयी झाले आहेत. सकट यांनी शोभा विनोद सकट यांचा २४८ मतांनी पराभव केला. शोभा सकट यांना २७६ मत मिळाली आहेत. सदस्य म्हणून निवडून आलेले गोकुळ मोरे यांना २३६, ममता पठाडे २५५, भास्कर सकट २०८, केशव पठाडे २०८, आत्माराम अहिरे १४५, कविता पठाडे १४८, प्रीती पठाडे १२० मते मिळाली आहेत.

कळवाडी येथे झालेल्या पोटनिवडणुकीत जयश्री वनाजी खवळे या ३३६ मतांनी विजयी झाल्या असून निमगाव येथे विपुल नंदाळे ५७४, अरुण पाटील ३५१, दादाजी हिरे ४२३ मतांनी विजयी झाले आहेत.


या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. डी.काळे, आर.जी.शेवाळे, दौलत गणोरे, एस.पी.विधाते, योगेश पाटील यांच्यासह अमित माने, राहुल देशमुख, शेखर आहिरे आदींनी कामकाज पाहिले.


बिनविरोध निवडून आलेले उमेदवार....

• काष्टी ग्रामपंचायत :- १) गुलाब सोनवणे, २) अरुण खैरनार, ३) श्वेता खैरनार, ४) बंडू सोनवणे

• निळगव्हाण ग्रामपंचायत :- १) चंद्रकला अहिरे, २) सुमन अहिरे


ताज्या बातम्या