Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ७ गोवंश जनावरांची सुटका;विशेष पोलिस पथकाची कारवाई

दि . 09/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) : - शहर पोलीस ठाणे हद्दीत काल रविवार दि.८ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास विशेष पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत ७ गोवंश जनावरे व चारचाकी वाहन असा सुमारे ६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंग, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने सदर कारवाई केली. शहरातील मोती तालाब भागातील सार्वजनिक शौचायलामागे शेख जाकिर शेख जहांगीर रा.कमालपुरा तसेच वाहन चालक व त्यांचे इतर साथीदार यांनी स्वत:च्या फायद्यासाठी व कत्तलीच्या उद्देशाने ७ गोवंश जनावरे बांधून ठेवलेली आढळून आली. यातील सर्व आरोपी फरार असून त्यांच्या विरुध्द गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, तुषार अहिरे, अभिजीत साबळे, दिनेश शेरावते यांचा समावेश होता.


ताज्या बातम्या