Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गांजाची बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या एकास अटक

दि . 09/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) - तालुक्यातील मालेगाव-मनमाड रस्त्यावरील चोंडी घाटातील एरंडगाव फाट्याजवळ २ लाख रुपये किमतीच्या गांजाची एका चार चाकी वाहनातून बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या एकास तालुका पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातून चार चाकी वाहन व ३७ किलो ५७८ ग्रॅम वजनाचा २ लाख ६ हजार ६७९ रुपये किमतीचा गांजा असा एकूण ४ लाख ६ हजार ६७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काल रविवार दि.८ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास  मालेगाव-मनमाड रस्त्यावरील चोंडी घाटातील एरंडगाव फाट्याजवळ असलेल्या पोलीस चौकी समोर तालुका पोलीसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान सदर कारवाई करण्यात आली. या नाकाबंदी दरम्यान आरोपी अक्षय प्रकाश गाडगे रा.पानसेमल ता. सेंधवा जि. बडवाणी (मध्यप्रदेश) हा त्याच्या सोबत असलेल्या तीन ते चार व्यंक्तींसह ( नावे माहीत नाही ) बेकायदेशीररित्या आपल्या ताब्यातील वाहन क्रमांक एमपी १२ सीए २२३६ हीच्यातून  विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा वाहतूक करताना आढळून आला. तालुका पोलीसांनी गाडगे यास ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून गांजा व वाहनासह एकुण ४ लाख ६ हजार ६७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाने करीत आहे.


ताज्या बातम्या