Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ली भाषा टिकवण्यासाठी सेवा दलाचा पुढाकार कौतुकास्पद - बापू हाटकर ; अहिराणी सोहळा उत्साहात

दि . 09/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- अहिराणी ही प्रभू श्री कृष्णांची ही भाषा असुन शालीवाहन शके एक पासुन अहिर लोकांची ही भाषा आहे आणि आजही ती जोपासली जाते. नव्या पिढीला जूना ठेवा जतन करून त्याचे संवर्धनाचा राष्ट्र सेवा दलाचा विचार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अहिराणी साहित्यिक बापू हाटकर यांनी राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित अहिराणी दिन समारंभा प्रसंगी केले.

येथील कर्मवीर या.ना.जाधव विद्यालयात स्व.डॉ.दा.गो.बोरसे अहिराणी नगरीत राज्य कार्याध्यक्ष गोपाळ नेवे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे  उदघाटन झाले. यावेळी मंचावर भाषा समन्वयक सिरत सातपुते, बापू हाटकर, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या विश्वस्त संध्या वडगे, राजाभाऊ अवसक, जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, तालुका कार्याध्यक्ष विकास मंडळ आदी उपस्थित होते.
सकाळी साडे आठला निघालेल्या पालखी मिरवणूकीत स्थानिक नागरिक, लोक कलावंत, पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी सहभागी होते. संबळ वाद्यवृंदाच्या तालात नृत्य करत जल्लोषात संगमेश्वर, सावता चौक, पाटील गल्ली येथून अहिराणी नगरीत सेवा दलातर्फे पालखीचे स्वागत झाले. या पालखी मिरवणुकीनंतर जाधव विद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी हाटकर  म्हणाले, प्रभू श्री कृष्णांची ही भाषा असुन खान्देशात प्राचीन काळात जे राजे आले त्यांनी गावे वसवली. तेथुनच अहिराणी संस्कृती वाढत गेली. महाराष्ट्राचा इतिहास खानदेशने निर्माण केला. अन्य भाषांपेक्षा समृद्ध भाषा अहिराणी आहे. अनेक शब्द असलेली भाषा समृद्ध असते. मराठी भाषेत देखील अहिराणी शब्द चपखल बसलेत. अहिराणी भाषा टिकली पाहिजे. अहिराणी अकादमी स्थापन झाली पाहिजे. यासाठी संमेलन व्हावे, पाठ्यपुस्तकात अहिराणी समाविष्ट करावी. सोंगाडे व महिलांनी अहिराणी जिवंत ठेवली. अहिराणी भाषेतील कवितांमधील प्रतिमा समृद्ध आहेत. अहिराणी भाषेची ताकद मोठी आहे. महाकवी कालिदास यांचा जन्म धडगाव येथील असावा असे मेघदूत वाचून वाटते.

गोपाळ नेवे म्हणाले, भाषा बोलली गेली नाही तर टिकणार नाही. आपल्या संवादात अहिराणी बोलली पाहिजे. सेवा दलाचे साने गुरुजी यांचे अंतरभरातीचे  स्वप्न साकार करण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे. राज्य सरकारने ३ डिसेंबर हा दिवस अहिराणी भाषा सन्मान दिन साजरा करावा यासाठी सेवा दल पाठपुरावा घेत आहे. माणसाच्या जगण्याचं संवादच माध्यम आहे. या बोलीभाषा टिकण्यासाठी सेवा दलाने पुढाकार घेतल. त्यासाठी कटिबद्ध होऊ यात. अहिराणी सोबत सर्व लहान मोठ्या भाषा टिकल्या पाहिजेत त्यानिमित्ताने सहिष्णू मानवी संस्कृती टिकली पाहिजे.

सिरत सातपुते म्हणाल्या,  देशभरातील बोली भाषांची सांस्कृतिक आघाडी भविष्यात उभी राहील. आपल्या बोली भाषा प्रमाण भाषेत विसर्जित होतात. परंतु पुढील पिढ्याना बोली भाषा कळावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे.
प्रास्ताविक विकास मंडळ यांनी केले. कवी राजेंद्र दिघे अहिराणीतून सुत्रसंचलन केले. आभार नचिकेत कोळपकर व स्वाती वाणी यांनी मानले. परिचय नाना महाजन व रविराज सोनार यांनी केला.
दुपारच्या सत्रात अहिराणी  लोककलांचा जागर रंगला. यामध्ये तळी भरणे, खंडेराया गीत, जात्यावरचे गाणं, कान्हुबाई गाणा, संबळ वादन, भारूड, अंबाबाई नृत्य, लग्नातील गाणं, पावरी वादन सादर झाले. यात सेवा दल बाल सैनिक, बालविदया निकेतन, कर्मवीर या.ना.जाधव, सावित्रीबाई फुले शाळेतील बाल कलाकार, नवापूरचे पावरी वादक तुकाराम पवार यांनी सहभाग नोंदवला. यावेळी जनार्दन देवरे यांच्या अहिराणी पोष्टर कवितेचे प्रकाशन करण्यात आले.
विलास वडगे यांनी ३ डिसेंबरला अहिराणी सन्मान दिनाचा ठराव मांडला. याचे नियोजन डॉ.एस.के.पाटील व किरण पगार यांनी केले.
यावेळी प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले,  कमलाकर देसले, उपमहापौर सखाराम घोडके, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सचिव अॅडव्होकेट जे.आर.अहिरे, संचालक अरूण जाधव,विश्वनाथ जाधव, वसंत पूरकर,शिशिर हिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव,संजय दुसाने,प्रमोद शुक्ला,भिका कोतकर,सतिष कलंत्री, सतिष कासलीवाल, प्रदीप कापडिया, अॅडव्होकेट आर.के.बच्छाव,धर्मा भामरे,श्रीराम सोनवणे, कैलास तिसरे, अॅड रमेश मोरे,एच.एस.वाघ, नरेंद्र सोनवणे,छगन बागूल,आर.के.बच्छाव, पंचायत समिती सदस्य अरूण पाटील,प्रविण वाणी, संजय अहिरे, विठोबा बागूल, सुधीर साळुंके,अशोक पठाडे, अशोक फराटे, राजीव वडगे, संजय अहिरे, राजेंद्र लोंढे,आर.डी.शेवाळे, वाय.व्ही.जाधव,बाळू डांगळे, एम.एस.देसाई,के.पी.पवार, रमेश पवार, कविता मंडळ, चंद्रशेखर शेलार, धनंजय पाटील,दिपक अहिरे, कल्पना अहिरे आदींसह मोठ्या संख्येने अहिराणी प्रेमी उपस्थित होते.


ताज्या बातम्या