Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आधीपासून असेलेला सेना-कॉंग्रेसचा सलोखा महापौर पदासाठी पुढील अडीच वर्षासाठी शिवसेना कॉंग्रेसचा हा सलोखा कायम रहितो का ?.

दि . 07/12/2019

मालेगाव: गृरुवार दिनांक १२ रोजी येथील महापालिकेच्या दुसऱ्या सत्रातील महापौर पदाची निवडणूक होत असून यासाठी सोमवार दिनांक ९ दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज खरेदीची मुदत असणार आहे.याच दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
मालेगाव महापालिकेत सध्या कॉंग्रेस व शिवसेना आघाडीची सत्ता असून महापौर पदी कॉंग्रेसचे रशीद शेख तर उप महापूर पदी सखाराम घोडके आहेत.गेल्या महिन्यात झालेल्या आरक्षण सोडतीत मालेगाव महापालिका महापौर पदाचे आरक्षण ओ बी सी महिला घोषित झाल्यानतर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने काल शनिवारीरोजी महापौर पदासाठी सहा तर उप महापौर पदासाठी चार उमेदवारांनी अर्ज घेतले असल्याचे माहिती नगरसचिव राजेश धसे यांनी दिली. 
यामध्ये महापौर पदासाठी कॉंग्रेसच्या ताहेरा शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जैबून्निसा समसुद्दा, जनता दातातर्फे शाने ए हिंद तर एम आय एम तर्फे सादिया लइक हाजी व मोमीन राजींया साहीद अहेमद तसेच शिवसेनेतर्फे कल्पना विनोद वाघ यांनी अर्ज घेतले आहेत.उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे निलेश आहेर व सखाराम घोडके तर गठबंधन आघाडीतर्फे अन्सारी अमानुतुलाला पीर मोहम्मद व अन्सारी अय्याज अहेमद मोहम्मद सुलतान यांनी अर्ज घेतले आहेत.
८४ सदस्य असलेल्या या सभागृहात सत्तेसाठी ४२ मॅजिक फिगर असून सध्यस्थितीत कॉंग्रेसकडे २९,महागटबंधनकडे २५,शिवसेनेकडे १३, भाजप ९ एम आय एम ७,असे संख्याबळ असून एक पद रिक्त आहे. राज्यात शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीचा सत्तापेटर्न अस्तित्वात आला असला तरी गेल्या अडीच वर्षापासून मालेगाव महानगरपालिकेत मात्र आधीपासूनच कॉंग्रेस शिवसेना आघाडी कायम आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षासाठी शिवसेना कॉंग्रेसचा हा सलोखा कायम रहितो का ? याकडे सा-यांचे लक्ष लागून आहे.

 


ताज्या बातम्या