Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर दोन ग्रामपंचायतीची आज पोटनिवडणूक

दि . 07/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील निळगव्हान, काष्टी व नगाव दिगर या तीन  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर निमगाव व कळवाडी या दोन ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक आज दि. ८ रोजी होत असून काल शनिवार रोजी निवडणुकीसाठी लागणाऱ्या निवडणूक साहित्यांचे वाटप तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

निळगव्हान, काष्टी व नगाव दिगर या तीन ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या या निवडणुकीत काष्टी ग्रा.प.तील १० पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. निळगव्हान ग्रा.पतील १० पैकी २ जागा बिनविरोध झाल्या असून ८ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगाव दिगर ग्रा.पच्या १० जागांसाठी निवडणूक होत असून एकूण २४ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच कळवाडी येथील पोट निवडणुकीसाठी प्रभाग ३ मधील १ जागेसाठी ३ तर निमगाव येथील प्रभाग १, २ व ३ मधील ३ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. यासह कुकाणे, दसाणे व गुगुळवाड येथील प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली आहे.

या निवडणुक प्रक्रियेसाठी काल शनिवार रोजी तहसीलदार राजपूत यांच्या मार्गदर्शनखाली साहित्य वाटप करण्यात आले. या निवडणुकीसाठी नगाव दिगरसाठी एस. डी.काळे, निळगव्हाणसाठी आर.जी.शेवाळे, काष्टीसाठी दौलत गणोरे, कळवाडीसाठी एस.पी.विधाते, निमगाव साठी योगेश पाटील हे निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहे.  

या निवडणुकीसाठी १३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली जाणार असून यासाठी १३ केंद्राध्यक्ष, ५२ सहाय्यक केंद्राध्यक्ष, १३ शिपाई, असे एकूण ७८ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सकाळी ७:३० ते ५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया राबविली जाणार असून सोमवार दि. ९ रोजी येथील तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजेला मतमोजणी प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिली.


ताज्या बातम्या