Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
राष्ट्र सेवा दलातर्फे आज अहिराणी भाषा दिनाचे आयोजन..

दि . 07/12/2019

मालेगाव: येथील राष्ट्र सेवा दलातर्फे आज दि. ८ डिसेंबरला रोजी अहिराणी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अहिराणी भाषेचा जागर या कार्यक्रमातून केला जाणार आहे. सकाळी साडेसात वाजता पालखी मिरवणुक काढून १० बाजेला राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाषा तज्ज्ञ पद्मश्री डॉ गणेश देवी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात येणार आहे.

येथील कर्मवीर या.ना.जाधव विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम सत्रात प्रमुख अतिथी अहिराणी साहित्यिक डॉ सुधीर देवरे हे 'अहिराणीनी आजनी खबरबात' या विषयावर तर अहिराणी नाटककार बापूसाहेब हाटकर 'अहिराणीना बठ्ठा इतिहास' या विषयावर बोलणार आहेत. दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते ४ 'अहिराणीन्या लोककलासना जागर' या अंतर्गत तळी भरणे, कानबाई,भोवाडा आदी अहिराणी विविध लोक कला सादर होणार आहेत.
तिसरे सत्रात अहिराणी भाषा ठराव मांडला जाणार आहे. खान्देशनी वानगीचे संपादक रमेश बोरसे यांच्या उपस्थितीत समारोप होईल.

गेल्या महिनाभरापासून या कार्यक्रमासाठी जोरदार नियोजन करण्यात आले आहे. मालेगावातील विविध संस्था, संघटना, समविचारी कार्यकर्ते, अहिराणी प्रेमी पुढाकार घेत आहेत. या निमित्ताने राष्ट्र सेवा दलाचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, तालुका कार्याध्यक्ष विकास मंडळ, राज्य सचिव नचिकेत कोळपकर, जिल्हा संघटक रविराज सोनार, संघटक सुधीर साळुंके, कोषाध्यक्ष राजेंद्र दिघे, राज्य सदस्य स्वाती वाणी व डॉ.एस.के.पाटील, के.एन.अहिरे, नाना महाजन, किरण पगार आदींसह सेवा दल सैनिक पुढाकार घेत आहेत. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अहिराणी भाषिक सह सर्वांनीच या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


ताज्या बातम्या