Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे महामानवाला अभिवादन “आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ.आंबेडकरांचे योगदान अविस्मरणीय व सर्वश्रेष्ठ”- उपप्राचार्य जी. एस. निकम

दि . 06/12/2019

रावळगाव : भारताचा प्रवास आज महासत्तेच्या दिशेने चालू असून भारताच्या उभारणी मध्ये अनेक महापुरुषांनी आपले प्राण पणाला लावले आहेत. त्यात अनेक महापुरुषांचे योगदान महत्वाचे असून या सर्व पेक्षाही वेगळा ठसा आपल्या कार्याने व विचाराने डॉ. आंबेडकरांनी उमठवला असून भारतातील जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था व कर्मकांड संपुष्ठात येऊन उद्याचा नवा भारत घडावा म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेवट पर्यंत लढा लढवला आणि जे काही वर्तमान भारताचे चित्र दिसत आहे ते निर्माण करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  योगदान अविस्मरणीय व सर्वश्रेष्ठ आहे. असे उपप्राचार्य प्रा.जी.एस.निकम यांनी “श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौदाणे ता. बागलाण, जि.नाशिक” संचलित  “कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे अध्यक्ष स्थानावरून प्रतिपादन केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री सुरेशजी वाघ हे होते.

पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतांना उपप्राचार्य प्रा.जी.एस.निकम यांनी डॉ.आंबेडकरांचा जीवनप्रवास उलगडून सांगितला व त्यांच्या कार्याचा गौरव उद्गार करतांना ते म्हणाले की, विसाव्या शतकातील स्वातंत्र्यपूर्ण व स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासाचे आकलन व विवेचन करतांना डॉ.आंबेडकरांच्या विचार व कार्याचा संदर्भ घेतल्याखेरीज पूर्ण होणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सामाजिक, राजकीय व आर्थिक क्रांतीचा प्रवाह अधिक व्यापक, सखोल व सघन केला. भारतातील पारंपारिक सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांकृतिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये विषमता, अन्यान, अज्ञान व दारिद्रय पसरलेला होता. त्या समाजव्यवस्थेत स्त्रिया, शुद्र व अतिशूद्र यांना सर्वच मानवी हक्क नाकारले होते. ही व्यवस्था मोडीत काढून नवीन समाज व नवी व्यवस्था निर्माण करण्याचे महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा.जी.एस.निकम यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस. टी. आंबेकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. स्वप्नील गरुड  यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.ए.एन.पाचंगे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.जे.व्ही.मिसर, प्रा. एन. एल. सोनवणे, प्रा.एन.बी.महाजनप्रा..के.अहिर प्राशेवाळे यांच्या सह  कार्यालयीन अधिक्षक दिपक पवार,महेंद्र पगारे,अमोल शिंदे, ,मंगेश नंदाळे,प्रवीण देवरेपाटील, यांच्या सह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्या