Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
रस्त्यांच्या कामावरून काँग्रेस नगरसेवकांचा निषेध ; स्थायीच्या बैठकीत खाली बसून कामकाजात सहभाग

दि . 06/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जुना-आग्रा रोडवरील जाफरनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी व वाहनधारकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रार करुनही सदर खड्डा बुजविण्याचे काम होत नसल्याने काँग्रेस नगरसेवक असलम अंसारी, निहाल अहमद मो.सुलेमान व फकिरा मो. शेख सादिक यांनी या प्रशनी लक्ष वेधून घेण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत खुर्चीवर न बसता खाली बसून कामकाजात सहभाग घेतला.

काल गुरुवार दि.५ रोजी येथील महापालिकेच्या सभागृहात सभापती डॉ. खालिद परवेज यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपायुक्त नितीन कापडणीस, सहा.आयुक्त राहुल मर्ढेकर, लेखाधिकारी कमरुद्दीन शेख, नगरसचिव राजेश धसे आदींसह स्थायी समिती सदस्य , अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शहरातील जुना-आग्रा रोडवरील जाफरनगर कडे जाणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचे काम वारंवार तक्रार करून काम होत नसून उपायुक्त नितीन कापडणीस यांनी स्वतः त्याठिकाणी येऊन परिस्थिती बघावी असा आग्रह अंसारी यांनी याबैठकी दरम्यान केला. मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर अंसारी यांनी सभात्याग केला. तर शहरातील कचरा समस्येवरून नगरसेवक मदन गायकवाड यांनी नाराजी व्यक्त करीत प्रभाग ११ मध्ये केवळ ७ सफाई कर्मचारी उपस्थित असल्याची बाब  निदर्शनास आणून देत संबधित स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी यांच्या बदल्या करण्याची मागणी केली. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील महसूल, उत्पन्न व प्रत्यक्ष खर्चाचाच्या अहवालावर अभ्यास करण्यासाठी वेळ लागणार असल्याने हा विषय तहकूब करण्यात आला. तर महापालिकेच्या सर्व रुग्णालयात सन २०१९-२० वर्षा करिता आवश्यक असलेले औषध, उपकरणे, रसायने व साहित्य पुरवणेकामीची निविदा यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आली.


ताज्या बातम्या