Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वाळू वाहतूक करणार्‍या चौघांविरुध्द गुन्हा दाखल ; विशेष पोलीस पथकाची कारवाई

दि . 06/12/2019

मालेगाव : म्हाळदे शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या चौघांविरुद्ध येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून अडीच ब्रास वाळू, ट्रॅक्टर व ट्रॉली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस शिपाई दिनेश शेरावत यांच्या फिर्यादीवरुन सदर गुन्हा दाखल करण्यात आला.
गिरणा नदीपात्रातून काळू राजू सोनवणे रा. महादेव मंदिराजवळ मालेगाव,  ट्रॅक्टर मालक अशोक भागवत यादव, संतोष गवळी दोन्ही रा.चंदनपुरी व चालक नाना माळी हे शासनाचा कुठलाही वाळू व गौण खनिजाचा परवाना नसताना अवैधरित्या वाळू उपसा करताना मिळून आले. यापैकी यादव, गवळी व माळी हे तिन्ही जण फरार झाले आहेत. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक म्हणून सागर कोते, पो.कॉ. टी.आर.आहिरे, डी.एस.शेरावते, ए.एम.साबळे, एस.के.सानप यांचा सहभाग होता  

 


ताज्या बातम्या