Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
विशेष पोलिस पथक कार्यान्वित

दि . 05/12/2019

अवैध धंद्यांना आळा बसावा व मालासंबंधी गुन्हे उघडकीस यावे यासाठी येथील अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विशेष पोलिस पथकाची नेमणूक केली आहे.

मालेगाव परिमंडळात असलेल्या महत्वाच्या बंदोबस्तामुळे तसेच या आधीच्या विशेष पोलिस पथकातील काही अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदली झाल्यामुळे आधीचे विशेष पोलिस पथक बरखास्त करण्यात आले होते. आधीच्या पथकाने केलेल्या कारवायांमुळे शहरातील अवैध धंद्यांना वचक बसला होता. या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक घुगे यांनी नवीन पथक कार्यान्वित केले असून या पथकात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून सागर कोते, पो.कॉ. टी.आर.आहिरे, डी.एस.शेरावते, ए.एम.साबळे, एस.के.सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


ताज्या बातम्या