Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
हैदराबाद प्रकरणातील दोषींना फाशी द्या , मालेगाव शहर महिला काँग्रेस कमिटीचा कँडल मार्च

दि . 05/12/2019

 हैदराबाद येथील महिला पशु चिकित्सकावर झालेल्या बलात्कार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस नगरसेविका व गटनेत्या ताहेरा शेख यांच्या नेतृत्वात मंगळवार दि.३ रोजी रात्री मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. 

महिला काँग्रेस कमिटीतर्फे शहारातील किदवाई रोडवरील पक्ष कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी मोर्चाच्या आघाडीवर ताहेरा शेख यांच्यासह कॉंग्रेसच्या शहरअध्यक्षा अनिता अवस्थी, कमरुन्निसा रिजवान, नूरजहा मोहम्मद मुस्तफा, आबेदा साबीर गौर यांनी हातात मेणबत्ती घेत घटनेचा निषेध केला. यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कॉंग्रेस कमिटीच्या सर्वच महिला पदाधिका-यांनी बलात्कार घटनेविषयी तीव्र संतप्त व्यक्त करीत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भाषणात केली. यावेळी मंगला भामरे, जाहेदा अश्पाक, यास्मिन मुश्ताक सय्यद आदींसह महिला कॉंग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


ताज्या बातम्या