Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दादा भुसे यांनी महानगर पालिकेच्या विरोधास कचरा ट्रेकरांसह वाजत गाजत मनपाच्या निषेधार्थ कचऱ्याची धिंड काढत अस्वच्छतेचा निषेध ..

दि . 04/12/2019

-मनपा उपयुक्ततांना काळे फासले..

-आयुक्त व उपयुक्त यांना महिला नगरसेवकांनी बांगड्या दिल्यात..

-महानगरपालिकेचा सफाईसफाई व्यवस्थापन कोलमडलेलं..

-संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे संतप्त झालेल्या माजी राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेनेच्या 15 नगर सेवकांनी मनपाच्या निषेधार्थ काढला मोर्चा...

-पंधरा वार्ड मधील नगरसेवकांनी स्वतः कचरा उचलून ट्रेकर घेऊन मनपा कार्यालयात...

मालेगाव शहरातील वाढता कचरा अस्वच्छता व त्यामुळे मालेगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न मोठया  प्रमाणावर रोगराई पसरली असून त्यामुळे मालेगाव मनपाच्या निषेधार्ह आज मालेगाव शहरात माजी मंत्री दादा भुसे यांच्यासह मनपाचे  १५ नगरसेवकांनी त्यांच्या स्वतः च्या वार्ड मधील कचरा उचलून १५ ट्रेकरांमध्ये जमा केला.मनपाला वेळोवेळी सांगून देखील या अस्वच्छतेकडे मनपा आयुक्त व उपयुक्त यांचे कायमच दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नगरसेवकांनी आमदार दादा भुसे यांच्यासह १५ नगरसेवकांनी १५ ट्रेकर कचरा मनपा कार्यालयात आणून  मनपाच्या मनपाचा निषेध करत वाजत गाजत कचऱ्याची धिंड काढली.तसेच उपयुक्त नितीन कापडणीस यांना काळे फासून आयुक्त व उपायुक्त यांना  बांगड्या देखील दिल्यात. 
शिवसेनेचे आमदार यांनी मनपाला वेळोवेळी  सांगून देखील शहरातील कचरा उचलला गेला नाही त्यामुळे आता हे अल्टिमेटम असून यावर विचार करून ताबतोब शहर स्वच्छता न केल्यास याचे तीव्र पडसाद उमटतील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार आयुक्त राहतील असे खडे बोला सुनावले.   
एवढे करून देखील मनपा प्रशासनाला याचा काही परिणाम होईल असे अशी चर्चा मात्र नागरिकांत होती.कारण सत्ताधारी सेनेलाच शहर स्वच्छता साठी भांडावे लागते म्हणजे काय हाही प्रश्नच आहे. 

 


ताज्या बातम्या