Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वर्धमान नगर मध्ये चार लाखांची घरफोडी; चोरट्यांनी धाडशी घरफोडी करीत मोटारसायकलही केली लंपास..

दि . 03/12/2019

मालेगावात चोऱ्यांचे प्रमाण वाढलं,पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. 

मालेगाव शहरातील वर्धमान नगर येथील महालक्ष्मी हौसिंग सोसायटी या उच्चभ्रू परीसरात आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी कैलास मोहनलाल सोमाणी मालेगाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सोमाणी यांचा ट्रान्सपोर्ट कमिशनचा व्यवसाय असून ते आपल्या पत्नी व दोन मुलांसह कॅम्प रोडवरील महालक्ष्मी हौसिंग सोसायटी येथे वास्तव्यास आहेत. रात्री फिर्यादी आपल्या पत्नीसह १२:३० पर्यंत टीव्ही बघत होते. या नंतर दोघेही आपल्या बेडरूम मध्ये झोपायला गेले. सकाळी सुमारे ७ वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांची पत्नी यांना आपल्या किचन समोरील बेडरूम मधील खिडकीची जाळी तोडून चोरी झाल्याचे कळताच त्यांनी आपल्या पतीस सदर बाब सांगितली. याप्रकरणी फिर्यादी यांनी आपला मुलगा निलेश यास पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पाठविले असता आपली होंडा कंपनीची अॅटिव्हा दुचाकी देखील चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादी नुसार दुचाकी क्र.एमएच ४१ एडी ६६४८ या वाहनासह
सुमारे ४ लाख ५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागदागिने चोरी झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. छावणी पोलिस पुढील तपास करीत असून छावणी पोलिस ठाणे परिसरात दुचाकी चोरी
व घरफोडीचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.


ताज्या बातम्या