Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
इ-नाम प्रणाली विषयक प्रशिक्षनाचे आयोजन

दि . 03/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुरुवार दि.५ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. इ-नाम प्रणाली विषयक प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले आहे. समितीतील मुख्य बाजार आवारातील सभागृहात सकाळी १० वा. या कार्यक्षेत्रातील शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल व कर्मचारी यांच्यासाठी या इ-नाम प्रणाली विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सभापती राजेंद्र जाधव व सचिव अशोक देसले यांनी दिली आहे. 

केंद्र शासनाने इ-नाम अर्थात राष्ट्रीय कृषी बाजार या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात मालेगाव बाजार समितीचा समावेश केला असून सप्टेबर २०१७ पासून गहू, बाजरी, हरभरा, सोयाबीन, मका, तसेच काही प्रमाणात कांदा या शेतमालाचे इ लिलाव सुरु झाले आहेत. या योजनेमुळे शेतमालास योग्य बाजारभाव, शेतमालाचे वर्गीकरण व योग्य हाताळणी, मालाचे योग्य वजन व विक्री होत असून माल विक्री केल्यावर तत्काळ शेतक-यांना बँक खात्यातमध्ये पैसे जमा होणार आहेत. तसेच या प्रणालीमुळे इतर राज्यातील व्यापारी व आडते देखील येथील बाजार समितीत दाखल होणा-या शेतमालाची बोली लावू शकतील यामुळे स्पर्धा निर्माण होऊन शेतमालास चांगला भाव मिळणार आहे. याकरिता शेतक-यांनी बाजार समितीकडे नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक व आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा. या प्रणालीची माहिती बाजार समितीच्या सर्व घटकांना व्हावी यासाठी प्रशिक्षण आयोजत करण्यात आले असून केंद्र शासनाने नियुक्त केलेले प्रशिक्षक रंगनाथ कटारे हे प्रशिक्षणसाठी उपस्थित राहणार आहेत. बाजार समितीतील सर्व व्यापारी, आडते, शेतकरी, हमाल, मापारी यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उप सभापती सुनील देवरे व सचिव अशोक देसले यांनी केले आहे.


ताज्या बातम्या