Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मक्याची बेकायदा शिवार खरेदी-विक्रीवर बाजार समिती आणि माथाडी कामगारांची कारवाई; जप्त केलेला माल लिलाव करणार...

दि . 03/12/2019

मालेगावात येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने बेकायदेशीर शिवार खरेदी विक्री करणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची सुरवात केली अजून माथाडी कामगारांसह बाजार समितीच्या काही व्यापाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनाकडून धडक कारवाई आज करण्यात आल्याने बेकायदेशीर खरेदी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात शिवार खरेदी सुरू असल्याचे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जे शेतकरी शेतमालाची विक्री शेतात करतील तसेच, अनधिकृत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आवाहन देखील बाजार समितीच्या वतीने करण्यात आली होती.बाजार समितीच्याच काही व्यापाऱ्यांनी परस्पर खरेदी केली जात असल्याची माहिती मिळत आहे.परंतु अश्या प्रकारच्या खरेदीसाठी निवडून आलेल्या काही संचालकांचा समावेश असल्याची चर्चा आहे.सुभाष ताराचंद अग्रवाल,जय भोलनाथ -दामोदर पन्नालाल अग्रवाल यांच्या गोदामात आज कारवाई करण्यात  आली.


ताज्या बातम्या