Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात शेकडो शाळकरी मुलं करताय औषधांसोबत बॉंडचा नशेसाठी वापर; डिके चौकातील धक्कादायक प्रकार नागरीकांनीच केला उघड..

दि . 29/11/2019

आता दहा ते अठरा वयोगटातील मुले 'स्टीकफास्ट', 'बॉण्ड', 'फेविक्विक' या अॅडेसिव्हचाही नशेसाठी वापर करत असल्याची धक्कादायक माहिती सोयगावात डिके चौकातील एका ठिकाणी बसलेल्या टोळक्यास स्थानिक नागरिकांनी पकडल्याने उजेडात आली आहे.

अधिक नशा यावी म्हणून 'नायट्राझिपाम', 'अल्प्रोझोलम' या औषधी गोळ्यांसह 'कोरॅक्स', 'फेन्सिंड्रील', 'मिंलिन्टक कोडीन' ही औषधे मोठ्या प्रमाणात तरुणांकडून सेवन केली जात असतानाच आता दहा ते अठरा वयोगटातील मुले 'स्टीकफास्ट', 'बॉण्ड', 'फेविक्विक' या अॅडेसिव्हचाही नशेसाठी वापर करत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.मालेगांव शहरातील युवापिढीची आधिच वाट लागली आहे! त्यात युवती-तरुणी देखील ड्रग्ज व नशिल्या पदार्थांच्या आहारी जात असल्याचा अनुभव मागील काही दिवसापूर्वी  कॅम्पातील रहिवाश्यांना आला होता. कॅम्प पोस्ट ऑफिस जवळील एका गल्लीत पांढर्‍या ऍक्टीव्हा वर स्वार असलेल्या दोघा युवतींनी चक्क आपल्या ‘हातातील नसेवर इंजेक्शन टोचून घेतांना’ पाहिल्याची अशी बातमी मालेगावकरांच्या कानाला ठिणग्या मारून गेली असतांनाच आज सोयगावात डिके चौकातील १२ ते १८ वायोगातील पाच ते सहा मुलांच्या टोळक्याला पकडले तेव्हा काही नागरिकांनी सांगितले कि गेल्या काही दिवसापासून दररोज १० ते १५ मुलांचे टोळके बसता आणि त्या ठिकाणी मुलं बॉंड नावाचा नशा करता या गोष्टीची खात्री झाल्यानतर काहींनी त्यांना पकडले आणि त्यांच्या घरच्यांना बोलावले आणि त्यांनी मुलं बॉंड चा नशा करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले.जर याबाबतीत तक्रार केली तर आपल्याच मुलाची समाजात इज्जत जाईल त्या भीतीपोटी कोणीही तक्रार करण्यास तयार नाही.
मुले प्लास्टिक कागदावर बॉण्ड, स्टीकफास्ट, फेविक्विक या एडीसीव्हची मात्रा टाकून त्याचा वास घेतात. या वासातून झिंग येऊन नशा चढते, काही मुले बॉण्ड बोटाच्या आकाराच्या बाटलीमध्ये टाकून त्याचा वास घशात ओढतात व त्या नशेत धुंद राहतात. अलीकडे काही शाळकरी मुले वेदनाशामक आयोडेक्सचा वास घेऊन नशा करतात; तर काही जण आयोडेक्स ब्रेडला लावून खात असल्याचे आढळल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

मालेगावचे बालपण उद्ध्वस्त करणाऱ्या या अंमली पदार्थांच्या आयातीवर तसेच विक्रीवर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी छापे टाकून कारवाईची धडक मोहीम राबवायला हवी. प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसत नाही. परिणामी, हा धंदा तेजीत येऊन त्याचा विळखा बालकांसह तरुण पिढीलाही बसतो आहे. नशा यावी यासाठी शोधले जाणारे नवनवे अंमली पदार्थ मुलांचे बाल्य गिळंकृत करू पहात आहे. मालेगावच्या पुर्वभागामध्ये कुत्तागोलीच्या नशेचे प्रकार उघडकीस आले आहेत.पोलीस प्रशासनाकडून कारवाही देखील करण्यात येत आहे.मात्र नशेचे लोन आता पश्चिम भागात देखील दिसू लागले आहे. अशी खंत बच्छाव यांनी व्यक्त केली आहे.
या सर्व गंभीर प्रकाराची दखल पालकांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे, आपला पाल्या शाळा-कॉलेजच्या नावाने दुचाकी घेवून कुठे-कुठे जातो, काय करतो, कुणाबरोबर वावरतो, त्याचे दिवस भरातील वर्तन कसे असते याची काळजी करणे प्रत्येक पालकाची व्यक्तीगत जबाबदारी त्यांनी ओळखावी आणि त्या दृष्टीने सावधानता बाळगावी अशी कळकळीची विनंती या निमित्ताने करण्यात येत आहे. हार्डवेअरच्या दुकानात मिळणारे ‘बॉण्ड’ नावाचे केमीकल सुंघून देखील विशिष्ट प्रकारची ‘गुंगी’ येते हा प्रयोग हायस्कुलचे विद्यार्थी देखील करीत असल्याचे निदर्शनास येत आहे, याबाबत ही पालकांनी अतिशय जागरुक राहणे ही गरज आहे.


ताज्या बातम्या