Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अवजड वाहनांना मालेगावात प्रवेश बंदी; निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे मालेगावात पालन होईल का...?

दि . 27/11/2019

मालेगाव शहरात जुना आग्रा रोडवर नवीन बसस्थानकासमोर महापालिका हायस्कूल ते सुपर मार्केटपर्यंत उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले
आहे. या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न व वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी १७ डिसेंबर २०१९ पर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जुना आग्रा रोडवरील दूध बाजार ते खोकानाका, कुसुंबा रोडवर गोंडवाडा ते नवीन बस स्टॅण्ड या मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी लागू असणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी आदेश काढला असून,या आदेशाची बेशिस्त आणि पोलीस प्रशासनाचे नजुमानाऱ्या वाहनचालक हा आदेश पाळतील का हा प्रश्न उपस्थित होतो..


ताज्या बातम्या