Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दोनवर्षापसून पोलिसांना चकमा देणारा ताहीर डॉन मालेगाव पोलिसांच्या ताब्यात..

दि . 25/11/2019

दोन वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर असलेला आरोपी ताहीर जमाल शहिद जमाल उर्फ ताहीर डॉन, रा.गोल्डन नगर, मालेगाव यास त्याचे साथिदारांसह अहमदाबाद-सुरत, राज्य गुजरात मधून अटक अटक करण्यात मालेगाव पोलिसांना यश मिळाले आहे. 

आरोपी ताहीर जमाल शहिद जमाल उर्फ ताहीर डॉन, वय-३०, रा.गोल्डन नगर, गल्ली नंबर-१, मालेगाव याचे विरुध्द मालेगाव शहरातील आयशानगर, पवारवाडी, रमजानपुरा, आझादनगर, किल्ला, कॅम्प, मालेगाव शहर व छावणी अशा सर्व पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, चोरी, खंडणी व खुनाचा प्रयत्न या सारखे गंभीर स्वरुपाचे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत.
आरोपी ताहीर जमाल शहिद जमाल उर्फ ताहीर डॉन याने वेगवेगळया आरोपींना सोबत घेवून मालेगाव शहरात विविध ठिकाणी वरिल प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपी याने सन-२०१८ पासून मालेगाव शहरात त्याच्या विविध साथिदारांसह गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे करुन तो फरार होता. सदर आरोपी हा अतिशय हुशार व चालाक असल्यामुळे तो गुन्हा केल्यानंतर लगेच परराज्यात निघून जात होता. त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करुन देखील मिळून येत नव्हता. परंतू त्याचा नियमित पणे शोध सुरु ठेवल्यामुळे गुप्त बातमी दाराने दिलेल्या बातमी वरुन मा.डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण तसेच मा.श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव, नाशिक ग्रामीण तसेच श्री. रत्नाकर नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव शहर, नाशिक ग्रामीण, श्री. मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी, कॅम्प विभाग, नाशिक ग्रामीण तसेच पोनि/के.के.पाटील, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा., नाशिक ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली १) सपोनि-संदीप दुनगहु, नेम.स्था गु.शा., २) पोना/ गोरक्षनाथ संवत्सकर, नेम .स्था गु.शा., ३) पोकॉ/देविदास गोविंद, नेम .स्था गु.शा., ४) पोकॉ/हेमंत गिलबिले, नेम.स्था गु.शा. व ५) पोहवा /सचिन धारणकर, नेम.पवारवाडी पो.स्टे., ६) पोना/दिनेश पवार, नेम.रमजानपुरा पो.स्टे., ७) पोकॉ/संजय पाटील, नेम.छावणी पो.स्टे. व ८) पोकॉ/संदिप राठोड, छावणी पो.स्टे. यांनी आरोपी १) ताहीर जमाल शहिद जमाल उर्फ ताहीर डॉन यास अहमदाबाद येथून तसेच २) अमीन शहा अरमान शहा उर्फ अम्मु, वय-२१, रा.सलीम नगर मालेगाव, ३) शेख आतीक शेख अमीन, वय-२४, रा.सुरत, गुजरात यांना सुरत येथून ताब्यात घेवून छावणी पोलीस स्टेशन येथे दाखल दरोडयाच्या गुन्हयांमध्ये अटक केलेली आहे.
आरोपी ताहीर जमाल शहिद जमाल उर्फ ताहीर डॉन याचे विरुध्द दाखल असलेल्या एकूण ३७ गुन्हयापैकी सन-२०१८ पासून दाखल असलेल्या एकूण १२ गुन्हयांमध्ये फरार होता.
आरोपी ताहीर जमाल शहिद जमाल उर्फ ताहीर डॉन यास दिनांक २१.०५.२०१८ रोजी उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग, मालेगाव यांनी एक वर्षासाठी नाशिक जिल्हयातुन हददपार करण्यात येत असलेबाबतचे आदेश पारित केलेले होते. परंतू सदरचा आरोपी हा सुमारे दोन वर्षापासून फरार असल्यामुळे त्याचे वरती सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती.

आरोपी ताहीर जमाल शहिद जमाल उर्फ ताहीर डॉन याने त्याच्या वेगवेगळया साथिदारांना सोबत घेवून वरिल प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे सदर आरोपी विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात येत आहे.


ताज्या बातम्या