Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




शिवशाही बस दरीत कोसळली; २० जण जखमी

दि . 25/11/2019

एसटी महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटातील ५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही शिवशाही बस पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्यावेळी बसमध्ये ४० प्रवाशी होते. कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडी या गावाजवळ असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट ५० फुट दरीत जाऊन कोसळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.


ताज्या बातम्या