Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी ४ तास उशिरा आलेल्या पथकाने शेतकाऱ्यांशी चर्चा न करताच केवळ दोन मिनिटातच उरकला दौरा...

दि . 22/11/2019

केंद्रीय पथकाकडून पाहणीचा फार्स.नियोजित वेळेपेक्षा  4 तास उशिरा पोहचले पथक..मालेगांवच्या चोंढी गावात केवळ केली पाहणी.
केवळ दोन मिनिटांत उरकला दौरा.शेतकाऱ्यांशी चर्चा न करताच पथक  रवाना.शेतकऱ्यांमध्ये नाराजी.

पाहणी दुष्काळी परिस्थितीची, मात्र दिमतीला वाहने आलिशान स्वरूपाची. मनात आले तर कोणाशी बोलायचे अन्यथा काही मिनिटांत पाहणी करत पुढे मार्गस्थ व्हायचे. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर, केंद्रीय पथकाने शुक्रवारी जिल्ह्य़ातील निफाड,चांदवड व मालेगाव तालुक्यात महामार्गालगतच्या काही निवडक गावांतील स्थितीची अवघ्या काही तासांत या पद्धतीने पाहणी केली. या धावत्या पाहणीमुळे शेतकऱ्यांनी पाहणीचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला.

काहींनी आपली व्यथा मांडून भरीव मदत देण्याची मागणी केली.
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर, केंद्रीय पथकाने जिल्ह्य़ातील निफाड,चांदवड व मालेगाव तालुक्यातील काही गावांना भेट देऊन दुष्काळाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.अवकाळी पावसाने कांदा,मका,बाजरी आणि कपाशी वाया गेले. पथकाने कुठे शेतकऱ्यांशी चर्चा तर कुठे त्यांच्याकडे दुर्लक्ष, असेही काही प्रकार घडले.गेल्या चार दिवसापासून जिल्हा या पथकाची वाट पाहत होते.पण चार तास उशिरा आलेल्या पथकाने तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसानीची पाहणीत  समस्यांचा पाढा वाचत असताना पथकाने औपचारिकता पूर्ण करण्यात धन्यता मानली.आपला मालेगाव तालुक्यातील  दौरा अवघ्या पाच मिनीटात आटोपले.  पाहाणी दौरा आटोपल्यावर मात्र दुष्काळीदौरा पाहणीसाठी आलेल्या पथकाला दोन तास मालेगावात शासकीय विश्राम गृहात थांबायला वेळ होता.यावरून केंद्रीय पथक शेतकऱ्यांची थट्टा केल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मंडल्या.राज्याने दिलेल्या तुटपुंज्या मदतीत ह्या पथकाडून काय मदत जाहीर होते की दुष्काळात होरपळलेल्या शेतकाऱ्यांची थट्टा,ह्याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आहे.


ताज्या बातम्या