Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अवकाळीपावसामुळे नुकसान ग्रस्थ शेतकऱ्यांसाठी शिवसेना मालेगावच्या वतीने मदत केंद्र सुरु

दि . 18/11/2019

मालेगांव तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्थ शेतकऱ्यांचे पंचनामे, पिकवीमा, कर्जमाफी याबाबत ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी शिवसेना संपर्क कार्यालय, मालेगांव येथे मदत केंद्र सुरु करण्यात आले असुन सदर मतदकेंद्राचे उद्घाटन आ.श्री.दादाजी भुसे, उपजिल्हाप्रमुख-प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख-संजय दुसाणे, महानगरप्रमुख-श्रीराम मिस्तरी यांचे हस्ते करण्यात आले.

ज्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई बाबत कृषी विभाग, महसूल विभाग, विमा कंपनी व इतर प्रशासकीय पातळीवर काही अडचणी येत असतील तर त्या शेतकरी बांधवांनी सदर मदत केंद्राकडे आपली तक्रार नोंदवावी. या मदत केंद्राव्दारे शेतकरी बांधवांना सर्वोतोपरी मदत केली जाणार आहे.

यावेळी नगरसेवक-राजेश गंगावने, मा.जि.प.सदस्य-प्रविण देसले, दिपक तलवारे, विष्णु पवार, किशोर सोनवणे, सुनिल माळी, रामभाऊ रक्ताटे, भिका सुर्यवंशी, ओंकार भिका व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. 


ताज्या बातम्या