Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सामाजिक बांधिलकी जपत वृद्ध नागरिकांना अत्यल्प दरात नेत्र तपासणी..

दि . 15/11/2019

मालेगाव: मित्र फाऊंडेशन आय केयर च्या माध्यमातून गोरगरिबांना खेडोपाडी नेत्र ( डोळे ) तपासणी अल्प दरात व्हावी. प्रत्येक नागरिकांला शहरात जाणे शक्य नाही. महागडी औषधे व उपचार तसेच तपासणी इत्यादी आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. म्हणून मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरातील सायने,गिगाव, रोझे, रोझाणे, सिताणे, दहिवाळ, चिंचगव्हाण, उंबरदे ह्या गावी जाऊन तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने
डोळे तपासणी शिबिर आयोजित केली जातं आहे. ह्या सामाजिक कार्यासाठी मालेगाव म न पा नगर सेवक श्री मदन ( बापू ) गायकवाड यांनी कंबर कसली असून लवकरच ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने विविध अजारांवर अल्प दरात ईलाज करू. ह्या सामाजिक कार्यासाठी त्यांना खंभीर साथ मिळाली ती त्यांच्या धम॔पत्नी सौ.मीनाताई मदन गायकवाड यांची त्यासबरोबर उंबरदे गांवाचे सरपंच श्री विजय ईप्पर दहिवाळ येथील सरपंच साहेबराव नरवाडे रोझे गांवाचे सरपंच श्री संजय उगले दहिवाळ ग्रामपंचायत सदस्य श्री नाना धोंडू पवार गिगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सोमनाथ जाधव यांची खंबीर साथ.


ताज्या बातम्या