Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दीड वर्षाच्या मुलाला गळफास देऊन मातेचीही आत्महत्या..

दि . 14/11/2019

 नांदगाव: आपल्या दीड वर्षाच्या पोटच्या गोळ्याला फाशी देऊन स्वतः गळफास घेऊन एका पंचवीस वर्षीय आईने आत्महत्या केल्याची घटना नांदगाव येथील गणेशनगर भागातील ठाकरवाडी येथे मंगळवारी रात्री उघडकीस आली, या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे,दरम्यान या महिलेने चिमुरड्या मुलाचा खून करून स्वतः आपली जीवनयात्रा का संपवली, हे एक गूढ असून या प्रकारामागचे कारण शोधणे, पोलीसांसमोरील मोठे आव्हान ठरले आहे, दरम्यान  बुधवारी शोकाकुल वातावरणात माय लेकांवर ठाकरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, या प्रकरणी महिलेचा पती व कुटुंबियांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव  येथे गणेश नगर परिसरातील ठाकरवाडी येथे राहणाऱ्या राहीबाई गोरख मेंगाळ या महिलेने मंगळवारी आपला पती मजुरीकाम करण्यासाठी शेतावर गेला असता राहत्या घराला आतून कुलूप लावून  तिचा दीड वर्षाचा मुलगा संदीप याला फाशी देऊन त्याचा खून केला,आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली, या बाबत दिवसभर दरवाजा बंद असल्याने कोणालाही घटनेची माहिती नव्हती, मात्र महिलेचा पती व इतर सदस्य सायंकाळी उशिरा घरी आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद दिसला,यावेळी हाका मारूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर छतावरील कौले काढून घरात पाहिले असता  माय लेक  गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. 

त्यानंतर तातडीने नांदगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, पोलीस निरीक्षक अनिल भवारी व उपनिरीक्षक बजरंग चौगुले घटनास्थळी दाखल झाले , दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, या घटनेत राहीबाई मेंगाळ हिने आपल्या दीड वर्षाच्या मुलाचा आधी फाशी देऊन  खून करून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र राहीबाई ने मुलाला का मारले? स्वतः जीवनयात्रा का संपवली, याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत, त्याचा शोध घेणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरले आहे,दरम्यान मंगळवारी मध्यरात्री या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शव विच्छेदनानंतर  मायलेकांवर बुधवारीअंत्यसंस्कार करण्यात आले, या वेळी सारे ग्रामस्थ हेलावून गेले,  या माय लेकाच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची पोलीस  चौकशी करत आहेत, अशी माहिती पो उप निरीक्षक बजरंग चौगुले यांनी दिली. 


ताज्या बातम्या