Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
राज्यातील महापालिकांमधील आरक्षण सोडत जाहीर; मालेगावचे  महापौरपद बीसीसी महिलाप्रवर्गासाठी राखीव

दि . 13/11/2019

मालेगाव  : राज्यातील महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई , ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसाठी महापौरपद खुल्यावर्गासाठी राखीव झाल्याने या शहरातील महापौरपदाकडे अनेक इच्छुकांच्या नजरा वळल्या आहेत. तर मालेगाव मनपाचे बीसीसी महिला राखीव सोडत निघाली असल्याने  त्यामुळे महापौरपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी म्हणून नगरसेवकांकडून आतापासूनच हालचाली सुरू होणार आहेत.

राज्यातील अनेक महापालिकांमधील महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला होता. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने सोडतीला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. त्याची मुदत २२ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापौरपदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, पनवेल, अकोला, चंद्रपूर, भिवंडी आणि जळगाव महापालिकेचं महापौरपद खुल्याप्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.

महानगरपालिकांची आरक्षण सोडत खालीलप्रमाणे  

मुंबई- ओपन
पुणे – ओपन
नागपूर – ओपन
ठाणे- ओपन
नाशिक – ओपन
नवी मुंबई – ओपन महिला
पिंपरी चिंचवड – ओपन महिला
औरंगाबाद- ओपन महिला
कल्याण डोंबिवली – ओपन
वसई विरार- अनुसूचित जमाती
मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
चंद्रपूर – ओपन महिला
अमरावती- बीसीसी
पनवेल- ओपन महिला
नांदेड-बीसीसी महिला
अकोला – ओपन महिला
भिवंडी- खुला महिला
उल्हासनगर- ओपन
अहमदनगर- अनुसूचित जाती (महिला)
परभणी- अनुसूचित जाती (महिला)
लातूर – बीसीसी सर्वसाधारण

सांगली- ओपन
सोलापूर-बीसीसी महिला
कोल्हापूर-बीसीसी महिला
धुळे – बीसीसी सर्वसाधारण
मालेगाव – बीसीसी महिला
जळगाव खुला महिला


ताज्या बातम्या