Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दुष्काळ निधितून बँका करताय कर्जाची कपात,शेतकऱ्यांची थट्टा; मालेगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार..

दि . 07/11/2019

मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची बँका करताय थट्टा.. 
मालेगाव: अवकाळी पाऊस,गरपीटीसारख्या अस्मानी अरिष्ठांमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करण्याची सरकारची आश्वासने हवेत विरली असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेत आहेत.कधी दुष्काळ,कधी अवकाळी पाऊस,कधी अतिवृष्टी तर कधी पूर यासारख्या अस्मानी संकटांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सातत्याने परीक्षा पहिली आहे.हातातोंडाशी आलेला घासही हिरावून घेतला जात आहे.अशा प्रत्येक संकटाच्या काळात राज्य सरकारमधील मंत्री,नेतेमंडळी शेतकऱ्यांची असवे पुसण्यासाठी धावून आली.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची आश्वासनेही दिलीत.त्यामुळे तत्कालीन दिलासा असला तरी बँकांच्या आडमुठे पणामुळे अनेकांना अद्यापही मदत मिळू शकली नाही.त्यामुळे सरकार डोळ्यांत धूळफेक केल्याची शेतकऱ्यांची भावना होऊ लागली आहे.
मागील वर्षी राज्यात पावसाने दांडी मारली असल्याने या दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देण्याचा तातडीने निर्णय घेण्यात आला. या बाबतीत अंमलबजावणीही झाली,ती मदत देण्यासाठी शासनाने टप्पे ठरवून दिलेत.पैसे बँकांनाही वर्ग केले गेलेत. त्यामुळॆ शेतकऱ्यांना कुठेतरी दुष्काळी परिस्थितीत मदत मिळेल असे समाधान शेतकरी वर्गाला वाटत असतानाचं शेतकऱ्याच्या खात्यावर आलेली मदत निधी बँकांनी थेट कर्जाच्या  रकमेत वर्ग करण्याच्या घटना मालेगाव तालुक्यात घडत आहेत. दुष्काळी अनुदानाच्या रकमेतून कर्जांच्या रकमेतून कपात करू नये असा शासनाने आदेश देखील काढला पण मालेगाव तालुक्यात या शासनाच्या आदेशाला मालेगाव तालुक्यात बँक ऑफ बडोदा कडून केराची टोपली दाखवली आहे.त्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक कोंडीत सापडला असतांना शासना कडून मिळालेली मदत निधीही त्यांना मिळत नसल्याने त्या शेतकऱयांनी मालेगाव तहसीलदार यांच्या कडे या बाबतील तक्रार हि केली आहे.पण,तहसीलदार यांच्या आदेशानंतर हि बँकेने यावर लक्ष दिले नाही.यावरून बँकांच्या मनमानी कारभार आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचे काम सुरु केले आहे. यावर शासनाकडून या बँकेवर काही ठोस कार्यवाही करण्यात यावी  अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. बँका आणि शासन यात समन्वय नसल्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. गेल्या आठवड्यात आर्थिक विवंचनेचा कंटाळून मालेगाव तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तरीही जर बँकांनी अस्या प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देणे थांबवत नसतील तर यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो. 

 


ताज्या बातम्या