Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कुकाणे येथे सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार व निवृत्ती सोहळा संपन्न  ..

दि . 03/11/2019

महेंद्र पगारे : वृत्तसेवा कुकाणे ..१७ वर्षाच्या भारतीय सेनेत कामगिरी बजावणारे श्री काळू दिलीप पवार यांचा कुकाणे येथे भव्य मिरवणूक व  नागरी सत्कार सोहळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. सरपंच शोभाबाई पगारे व उपसरपंच अशोक डापसे यांनी पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वडनेर पो स्टेशन ऐ पी आय.,मोताळे साहेब तसेच बीजेपी महानगर प्रमुख सुनील आबा गायकवाड, मा.सर्जेराव पवार ,श्रावण महाराज ,पवन भामरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

काळू पवार यांनी १७ वर्ष  देश सेवा केली.त्याबद्द्ल मी त्यांचा आभारी आहे. खर तर सीमेवरती सेवा बजावणे खूपच अवघड असते.  परंतू आधीपेक्षा आता खुप मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत. आताच्या मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांमुळे खुप मोठ्या प्रमाणात संरक्षण धोरणं मध्ये बदल झालेला आपल्याला जाणवते असे आपल्या भाषणात सुनिल आबा गायकवाड यांनी सांगितले.

 यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

 देशाची सेवा ही सर्वात्तम सेवा असून,ती उत्तम रित्या काळू पवार यांनी बजावली आहे.कुकाणे सारख्या लहान गावात उत्तम असा सेवा पूर्तीचा कार्यक्रम आयोजन पाहून मला खूप आनंद झाला तसेच काळू पवार यांना गावातील तरुणांना मार्गदर्शन करावे  भारतमातेच्या सुपुत्रास माझा शतशा प्रमाण अश्या  शब्द्दात वडणेर पोलीस स्टेशन चे ऐ.पी.आय.मोताळे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन गोविंद खैरनार यांनी केले.

यावेळी नाना पवार,आर्मी मॅन योगेश ठाकरे ,ज्ञानदेव डापसे, सतिष देवरे ,भगवान शिंदे,आप्पा शेवाळे,महेंद्र पगारे , डॉ.ज्ञानेश्वर सोनवणे,राहुल पवार ,संजय बाविस्कर ,सोपण पवार ,गणेश निकम ,जनार्धन लोंढे,अनिल पगारे, कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील मंडळी उपस्थित होती.    

 

प्रतिक्रिया

"कुकाणे ते जम्मू हा प्रवास खडतर होता.लहान पणा पासून मला आर्मी जाण्याचे ध्येय होते.ध्येय निश्चित झाल्यावर त्याच्या प्रति जिद्द बाळगली आणि यशस्वी झालो .खर तर आपल्याच  गावातील रंजन अहिरे (पहिले आर्मी मॅन) हे माझे आदर्श होते .त्यांच्या प्रेरणेतून मला आर्मीकडे जाण्याची जिद्द निर्माण झाली.मी वर्दी मुळे सत्य कायम स्वरूपी बोलण्याचे शिकलो.आणि पुढील आयुष्य हे गावातील माझ्या तरुण मित्रांना मार्गदर्शन करण्यासाठी देईल.माझं माझ्या गावाशी माझ्या कर्म व जन्म भूमी शी कायम एकरूप राहीन. १७ वर्ष्याच्या कार्यकाल देशाची सेवा करता करता कसा गेला कळालाच नाही.”

{काळू पवार, निवृत्त सैनिक}


ताज्या बातम्या