Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जिल्ह्याभरात पावसाचा हाहाकार ; नद्या, नाले तुडुंब, बळीराजा हतबल

दि . 02/11/2019

कसमादे न्युज
नाशिक जिल्ह्यासह परिसरात रात्रभर बरसत असलेल्या मुसळधार पावसाने नद्या, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. रात्रभर सुरू असलेल्या या पावसामुळे पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून शेतांमध्ये पाणी शिरले आहे. 
मालेगाव शहर व  परिसरातील नागरी वस्तीत पावसाचे पाणी घुसले तर तालुक्यातील सौदाने येथील नदीला पूर आल्याने काही टपऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तालुक्यातील मेहुणे गावात गेल्या दीड वर्षा पासून दुष्काळग्रस्त परिस्थितीत शासनातर्फे टँकर ने पाणी पुरवठा होत होता गावातील सुखी नदीला काल रात्री झालेल्या पावसामुळे पूर आलेला आहे असा पूर व पाणी मागील ८ ते १० वर्षा पासून या नदीला नव्हते पुरामुळे नदीच्या शेजारी असलेले शेती व गावाच्या आजूबाजूला असलेले सखल भागात नदीचे पाणी शिरले आहे त्यामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. 
-------
-  उमराना, सौंदाणे, मनमाड, भागात भयानक पाऊस,
-  लहान लहान नद्यांना महापुराची स्थिती, 
-  घरसंसार, चारा, जनावरे नदीत वाहत आहे.
-  मालेगाव शहर जलमय
- शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
- सौंदाणे येथील गलाठी नदीला तब्बल 22 वर्षा   नंतर महापुराचे रूप
 - नागरिकांकडून मदतीचा टाहो नदी काठचे दुकान पुरात वाहून गेले.


ताज्या बातम्या