Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नागरिकांनी साचलेल्या पाण्यात उतरत स्वतः केली सफाई

दि . 02/11/2019

मालेगाव - सोयगाव येथील विष्णू नगर भागात गेल्या महिन्याभरापासून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेल्या पाण्यामध्ये अक्षरशः शेवाळ साचले असून या पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकानी संताप व्यक्त करत स्वतः या घाण पाण्यात उतरत या पाण्यातील शेवाळ काढले आणि रस्ता स्वच्छ केला.
गेल्या दोन आठवड्यापासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे सोयगावसह परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात डांसाचे
साम्राज्य पसरले आहे.  
गेल्या महिन्याभरापासून पावसाचे पाणी साचल्यामुळे या पाण्यावर शेवाळ झाले असून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोयगाव परिसरातील विठ्ठल नगर, विष्णु नगर, सोनाई संकुल या पाण्यामुळे या भागात कॉलनी आदी भागात गेल्या महिन्याभरापासून तलावाचे स्वरूप रस्ते देखील पुरते पाण्याखाली गेले आहेत.  पाणी पूर्णपणे दुषित झाले आहे. या भागातील बहुतांश नागरिकांच्या कंपाऊंडमध्ये देखील पाणी साचलेले आहे. अनेक दिवस उलटून देखील या भागात पाणी वाहत आहे. साचलेल्या घाण पाण्यामुळे डास, शेवाळ तसेच सांड पाण्यामुळे विविध रोगराई निर्मितीला आमंत्रण मिळत आहे. परिसरातील सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिका मात्र या बाबतीत अजाण असून कोणत्याही प्रकारचे उपपयोजना करणयात आलेल्या नाहीत त्यामुळे विष्णू नगर भागातील नागरिकांनी स्वतः पाण्यात उतरत आपला परिसर स्वच्छ केला.
-----
प्रतिक्रिया - गेल्या महिन्याभरापासून विष्णू नगर भागात पाणी साचले आहे. त्यामुले रोगराई पसरत आहे. मनपा प्रशासन याकडे दुर्लक्षच करीत आहे.पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांनी पाण्यात उतरत रस्ता स्वच्छ केला.
महापालिलेने याकडे लक्ष द्यावे.
- दिनकर गायकवाड, रहिवाशी


ताज्या बातम्या