Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तब्बल ३१ वर्षांनी भरला वर्ग !

दि . 02/11/2019

मालेगाव :आघार बु ! (ता.मालेगाव) येथील जनता विद्यालयात १९८८ च्या दहावीच्या माजी विद्यार्थी मेळावा साजरा करण्यात आला तब्बल ३१ वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी,विद्यार्थिनी एकत्र आलेत,सोशिल मीडिया च्या माध्यमातून व्हाट्सएप द्वारे सगळ्या मित्रांनी एक ग्रुप करुण हळू हळू सर्व फोन नंबर त्या ग्रुप च्या माध्यमातून गोळा करण्यात आलेत आणि दिवाळी ची सुट्टीचे औचित्य साधुन भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या आवारात त्या वेळचे सर्व वर्ग मित्र, सर्व शिक्षकवृन्द अतिशय आपुलकीने एकत्र आलेले पाहुन सगळे भारावून गेलेत, शालेची बेल वाजवून सगळे विद्यार्थी वर्गात समोरच्या बाकांवर बसले,वर्ग शिक्षक वी.जे चव्हाण यांनी हजेरी घेतली सगळ्यांनी yes sir म्हणून प्रतिसाद दिला,सर्व शिक्षकांचा सत्कार करुण ओळख परिचय करुण देण्यात आला,त्या काळी दहावीत पहिला आलेला विद्यार्थी मनीष जैन हे पुण्यात नामांकित कंपनित उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले,तसेच नितिन मैंद हे एस. टी. महामंडलात उत्तर महाराष्ट्रातील विभागीय अधिकारी म्हणून शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला,भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष नीलेश कचवे यांचे राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला,आघारचे माजी सरपंच डॉ प्रवीण वाघ, ढवलेश्वर चे माजी सरपंच व त्यांच्या सुविद्य पत्नी सरपंच वैशाली निकम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदर केल्यामुळे सर्वांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले,जुन्या आठवनिंना उजाळा देत व्यक्तिगत आयुष्यातील अनुभव सगळ्यांनी मांडले,शिक्षकवृन्द यांनी सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रथित यश पाहुन कौतुक केले व शुभेच्छा दिल्या,सूत्र संचलन किशोर हिरे,प्रवीण वाघ यांनी केले,या प्रसंगी शिक्षक चव्हाण सर,सावंत सर ,घोरपड़े सर,सोनवणे सर उपस्थित होते,महेंद्र हिरे,मधुकर आहिरे,सुनील पगार,प्रकाश सावंत,शिवाजी सावंत, संजय सावंत,दिलीप खैरनार,मोहन सूर्यवंशी,सुधाकर वाघ, मोती पगार,संदीप निकम,दिनेश निकम,रंजना बच्छाव,सुनीता आहिरे,सरिता भदाने, मनिषा सावंत,रंजना हिरे, असे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

 


ताज्या बातम्या